Headlines

Former minister Suresh Navales Join Shinde camp spb 94

[ad_1]

औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात आज माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून बीडमधून नवले समर्थक कार्यक्रमाकडे रवाना होत आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. तर एकेकाळी ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले सुरेश नवले आज मात्र शिंदे गटात प्रवेश होणार आहेत. हा शिवसेनेसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – “यापूर्वीच त्यांना अटक व्हायला हवी होती”; ईडी कारवाईनंतर नवनीत राणांची राऊतांवर टीका

राजकारणात बरेच वर्ष अलिप्त राहून त्यांनी नवले मित्र स्थापन केलं. त्या माध्यमातून काम आज मात्र ते प्रवेश करत आहे. सिल्लोड नगर परिषदेस भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन अब्दुल सत्तार यांनी केले. याच कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्यासह सुरेश नवले यांचा देखील प्रवेश शिंदे गटात होणार आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेही मळलेल्या वाटेनेच; मालेगाव जिल्हा निर्मिती विषयी केवळ सकारात्मकतेचा सूर

शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेत प्रवेश करतो आहे. हा गट नाही. हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे मी आणि माझे मित्र आज आम्ही प्रवेश करतो आहे. उद्धव ठाकरे हे गेली अडीच वर्ष आमदार खासदारांपासून हजारो कोस दुर होते. आमदारांना भेटणं त्यांना शक्य नव्हतं. अत्यंत अपमानास्पद वागणूक आमदार आणि खासदारांना मिळाली आहे. त्यातून हा उठाव घडला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला तसा अर्थ राहत नाही, अशी प्रतिक्रिय सुरेश नवले यांनी माध्यामांशी बोलताना दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *