Headlines

झोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर

[ad_1]

Tradition : मुल जेव्हा लहानाचं मोठं होतं त्याचवेळी त्याच्यावर कुटुंबीयांकडून काही संस्कार केले जातात. काही गोष्टी सांगितल्या जातात. काय योग्य आणि काय अयोग्य याची शिकवणही दिली जाते. या साऱ्यामध्येच एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, कदाचित ती तुम्हालाही सांगितली असेल, की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण, कधी विचार केलाय का, की असं का? (Facts about hindu religion)

असं म्हणतात की देवाधिकांशी आहे त्यांचा संदर्भ… 

कुटुंबीयांकडून सांगितल्या जाणाऱ्या या समजुतीचा थेट देवाधिकांशी संबंध आहे असं म्हणतात. असं सांगितलं जातं की, (Mahabharata) ज्यावेळी भीम (Bhim) कुठेतरी जाण्यासाठी निघाला होता, त्यावेळी हनुमान वानराच्या रुपात त्याच्या वाटेत झोपले होते. त्यांच्या शेपटीनं संपूर्ण वाट अडवली होती. भीम तिथून जात असताना त्यानं ती शेपूटही ओलांडली नाही. उलटपक्षी वानररुपी मारुतीरायाला शेपटी बाजुला करण्यास सांगितलं. 

 

मारुतीरायानं (Hanuman) मात्र त्यासाठी नकार देत शेपटी ओलांडून जाण्यास सांगितलं. पण, भीमानं तसं करण्यासही नकार देत स्वत:हून शेपटी बाजूला करण्यास सुरुवात केली. संपूर्ण ताकदीचा वापर करुनही वानररुपी मारुतीरायाची शेपटी काही तसुभरही हलली नाही. तेव्हाच भीमाच्या लक्षात आलं की हा काही सामान्य वानर नाही. तेव्हा त्यानं परिचय मागताच हनुमानानं आपलं विशाल रुप त्याला दाखवलं आणि युद्धात विजय मिळवण्यासाठी भीमाला आशीर्वाद दिला. 

भीमानं का ओलांडली नाही शेपटी? 

मारुतीरायानं जेव्हा भीमाला शेपटी ओलंडण्यास सांगितलं, तेव्हा नकार देत भीम म्हणाला होता ‘या विश्वात प्रत्येक प्राण्यामध्ये देवाचा अंश आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्राण्याला ओलांडणं म्हणजे परमात्त्म्याचा अनादर करणं होय.’ त्यामुळं अनादर न करता भीमानं शेपटी बाजुला सारण्याचा प्रयत्न केला होता. 

….म्हणून झोपलेल्या व्यक्तीला ओलांडू नये (why you should not cross sleeping person)

भीमानं जे कारण देत मारुतीरायाला ओलांडलं नव्हतं, त्याच कारणाच्या आधारे आपल्यालाही कोणत्याच झोपलेल्या व्यक्तीला ओलांडू नये असं सांगितलं जातं. असं केल्यास आपण ईश्वराचाच अनादर करतो असं समजलं जातं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *