Headlines

एफआयआर दाखल झाल्यानंतर Bharati Singh हिच्याकडून पहिली पोस्ट,देवाचा फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1]

मुंबई : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह (Bharati Singh) तिच्याच एका जोक्समुळे वादात सापडलीय. भारती सिंहने दाढी आणि मिशांबाबत एक जोक मारला होता. या जोकवरून शीख समुदाय आक्रमक झालीय. भारती सिंहने यावर माफी देखील मागितली होती. मात्र तरीही तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतीने पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

वाद काय ? 
टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन भारतीच्या एका कॉमेडी शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी भारतीने दाढी-मिशी का नको. दूध प्यायल्यावर दाढी तोंडात घातली तर शेवया टेस्ट येतात. माझे अनेक मित्र ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ते दिवसभर दाढी-मिशीतील उवा काढण्यात घालवतात. अशा आशयाचा जोक भारतीने मारला होता.  

भारतीच्या (Bharati Singh) या वक्तव्यावर शीख समुदायातील लोकांनी आदल्या दिवशी तिच्या विरोधात जोरदार निदर्शने करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी भारती सिंहच्या विरोधात आयपीसीच्या कलम 295-ए अंतर्गत एफआयआर नोंदवलाय. हा एफआयआर एसजीपीसीने (Shiromani Gurdwara Parbandhak Committee)नोंदवला आहे. 

भारतीची पोस्ट 

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर भारती सिंगने आता तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे.या संपूर्ण वादात भारतीला (Bharati Singh)देवाची आठवण झाली आहे.

  भारतीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गणपतीचा फोटो शेअर करून हात जोडणारा इमोजी तयार केला आहे. या कठीण काळात तिने देवाकडे मदतीची याचना केल्याचे पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

माफिनामा 
भारती सिंहने (Bharati Singh) व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.  भारती म्हणते की, मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तुम्हीही तो व्हिडिओ पहा, असे आवाहन तिनं केलंय. ती म्हणाली, “मी कुठेही कोणत्याही धर्म किंवा जातीबद्दल बोलले नाही किंवा या कोणत्या धर्माचे लोक दाढी ठेवतात असा उल्लेखही नाहीय.

तुम्ही व्हिडिओ पहा. मी कोणत्याही पंजाबींबद्दल म्हटलं नाही की पंजाबी लोकांना दाढी मिशा आहेत. मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते… माझ्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी हात जोडून माफी मागतो.

ती पुढे म्हणते, मी स्वतः पंजाबी असून माझा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. त्यामुळे ती पंजाबचा पूर्ण सन्मान करते. मला पंजाबी असल्याचा अभिमान असल्याचेही भारतीनं म्हटलंय. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *