Headlines

अखेर कॅमेराची नजर पडलीच! जखमी म्हणून बांगलादेशला न गेलेला Jasprit Bumrah पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये स्पॉट

[ad_1]

Jasprit Bumrah carbon copy Kid: इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान (ENG vs PAK) यांच्यात टेस्ट सिरीज (Pakistan vs England Test series) सुरु आहे. मुल्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 26 रन्सने पराभव केला. दरम्यान दुसऱ्या विजयाने इंग्लंडच्या टीमने 3 सामन्यांची सिरीज देखील जिंकून घेतली. या सामन्यामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. पाकिस्तानचे चाहते (Pakistan Fans) देखील मोठ्या संख्येने हा सामना पहायला आले होते. दरम्यान ही टेस्ट संपता-संपता चाहत्यांना मात्र टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आठवण झाली आहे.

झालं असं की, मुल्तानच्या क्रिकेट स्टेडियममध्ये (Multan International Cricket Stadium) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला गेला. सामन्याच्या चौथ्या दिवशी बुमराह सारख्या दिसणाऱ्या एका लहान मुलाला स्टेडियममध्ये स्पॉट करण्यात आलं. या लहान मुलाचे फोटो व्हायरल होतायत. या मुलाचा फोटो पाहिलात तर तुम्ही देखील गोंधळून जाणार आहे. स्डेडियममध्ये बसलेला हा मुलगा डिक्टो बुमराह सारखा दिसतोय. 

बुमराह सारखा दिसणारा हा मुलगा पाहून तुम्हाला वाटेल की, बुमराह लहानपणी असाच दिसत असेल. सध्या बुमराह सारखा दिसणारा हा मुलगा सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. अशातच आता, बुमराबकडून या फोटोवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव

दुसऱ्या कसोटी सामन्यात (Pakistan vs England, 2nd Test) इंग्लंडने पहिल्या डावात 281 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 275 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य ठेवलं. मात्र, अखेर पाकिस्ताला अखेर 328 धावांवर समाधान मानावं लागलं. मार्क वूडने (Mark Wood) घातक गोलंदाजी करत दुसऱ्या डावात 4 गडी तंबूत पाठवले.

तीन सामन्याची मालिकेतील (Pakistan vs England, 3rd Test) अखेरचा सामना येत्या 17 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कराचीमध्ये (karachi) हा सामना रंगणार असल्याने पाकिस्तानला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेच लाज राखण्याचं लक्ष्य बाबर सेनेचं असणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *