Headlines

FIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं ‘इतक्या’ लाखांचं नवं घर!

[ad_1]

FIFA World Cup 2022 : यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपला (FIFA World Cup 2022) सुरुवात झाली आहे. केवळ काही देशच नव्हे जगभरात वर्ल्डकपचे चाहते दिसून येतात. भारतातही फुटबॉलचे (Football) चाहते आहेत आणि यामध्ये सर्वाधिक चाहते हे केरळमध्ये (kerla) दिसून येतात. केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं. यामध्ये कोच्चीच्या जवळपास राहणाऱ्या चाहत्यांनी एकत्र मॅच पाहण्यासाठी एक मोठं काम केलंय.

कोचीनमध्ये राहणाऱ्या 17 चाहत्यांना एकत्र फुटबॉलची मॅच पाहता यावी यासाठी त्यांनी चक्क 23 लाखांचं घर खरेदी केलंय.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, केरळच्या कोच्चीमध्ये मुंडक्कमुगल गावात 17 लोकांनी एकत्र 23 लाखात एक घर खरेदी केलंय. घर खरेदी करण्यामागे कारण आहे ते म्हणजे, या सर्व चाहत्यांना एकत्र बसून सामने पाहता येतील. या मित्रांनी हे घर फुटबॉल वर्ल्डकमध्ये सहभागी झालेल्या टीमच्या झेंड्यांनी सजवलं आहे.

या चाहत्यांनी फुटबॉल स्टार लियोनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे पोट्रेटही लावलेत. याशिवाय त्यांनी या घरात मोठ्या स्क्रिनचा टीव्हीही लावला आहे. 

यापैकी एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, फिफा वर्ल्डकप 2022 साठी आम्ही काहीतरी खास करण्याची योजना आखलीये. आमच्यापैकी 17 जणांनी आधीच 23 लाखांना घर विकत घेतलं. हे घर फिफा टीमच्या झेंड्यांनी सजवलंय. आम्ही इथे एकत्र जमून सामना पाहण्याचाही बेतही आखलाय.

घर खरेदी करण्यापूर्वी या ग्रुपने एकत्र फुटबॉल बघण्याची एका अनोखी परंपरा निर्माण केली. ते गेल्या 15-20 वर्षांपूर्वीपासूनच असं करत होते. यामध्येच त्यांनी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

या सगळ्यामुळे भविष्यात पुढच्या पिढीलाही फुटबॉलचा आनंद घेता येईल. FIFA वर्ल्डकप 2022 कतारमध्ये 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आजकाल केरळमधील प्रत्येक रस्त्यावर फुटबॉल स्टारचे मोठे पोस्टर्स आणि होर्डिंग्ज दिसून येतायत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *