Headlines

FIFA World Cup 2022 : ”…हे खुप लाजिरवाण आहे’, रोनाल्डोची गर्लफ्रेंड प्रशिक्षकावर भडकली

[ad_1]

FIFA World Cup 2022 : जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर सुरु आहे. एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. त्यात आता नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा (Portugal vs Switzerland) 6-1 ने पराभव केला. या विजयासह पोर्तुगालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पोर्तुगालच्या या विजयाच्या चर्चेपेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डोला (cristiano ronaldos benching) सामन्या दरम्यान बेंचवर बसवल्याची जास्त चर्चा रंगली होती. या घटनेवर फॅन्सनेही नाराजी व्यक्त केली. त्यात आता रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (georgina rodriguez) या घटनेवर संताप व्यक्त करत प्रशिक्षकावर टीका केली आहे. 

17 मिनिटेच मैदानात खेळला 

स्वित्झर्लंड (Portugal vs Switzerland) विरूद्धच्या सामन्या दरम्यान रोनाल्डो 17 मिनिटेच मैदानात खेळताना दिसला. बाकी इतर वेळ तो मैदानात बेंचवर बसला होता. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला प्रशिक्षक सँटोस यांनी रोनाल्डोला (cristiano ronaldos) मैदानात उतरवले. यापुर्वी पोर्तुगालने 5 गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली होती. 21 वर्षीय खेळाडू गोन्कालो रामोसने पोर्तुगालच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रामोसने 17, 51 आणि 67 व्या मिनिटाला हॅट्ट्रीक नोंदवली होती. यामुळे  पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6-1 ने पराभव केला. अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेऊन प्रशिक्षक सँटोसने (portugal coach santos) रोनाल्डो विनाही संघ जिंकू शकतो हे दाखवून दिले होते.

रोनाल्डोची गर्लफ्रेंड काय म्हणाली? 

या घटनेनंतर रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (georgina rodriguez) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने  पोर्तुगाल प्रशिक्षक सॅंटोसवर सडकून टीका केली. या पोस्टच्या सुरूवातीला तिने पोर्तुगालचे अभिनंदन केले. तसेच मैदानातील त्या घटनेची आठवण काढताना ती म्हणाली की, 11 खेळाडू राष्ट्रगीत गात होते तेव्हा सर्व कॅमेरे तुझ्यावर होते. रोनाल्डो यावेळी बेंचवर बसला होता आणि कॅमेरामन 11 खेळाडूंना कॅमेरात दाखवण्याऐवजी बेंचवर बसलेल्या रोनाल्डोला दाखवत होते.

जॉर्जिना रॉड्रिग्ज (georgina rodriguez) पुढे म्हणाली की, किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आम्ही 90 मिनिटे जगातील सर्वोत्तम खेळाडूचा आनंद घेऊ शकलो नाही. मात्र फॅन्सनी तुला चिअर्स करणे, तुझ्या नावाची घोषणा करणे थांबवले नाही, असे तिने म्हटले. शेवटी तिने लिहले की, देव करो, तु आणि तुझा खरा मित्र (सॅंटोस) एकत्र राहून आणखीण एक चांगला सामना अनुभवायला मिळावी, अशी आशा आहे. 

दरम्यान जॉर्जिना रॉड्रिग्जच्या (georgina rodriguez) सॅंटोसवरील टीकेची आता फुटबॉल विश्वात एकच चर्चा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *