Headlines

FIFA World Cup 2022 : Cristiano Ronaldo ने रचला इतिहास; फुटबॉलप्रेमींना खडबडून जाग, पाहा Video

[ad_1]

FIFA World Cup 2022 Cristiano Ronaldo : FIFA World Cup 2022 कतारमध्ये गुरुवारी खेळली गेली पोर्तुगाल विरुद्ध घानाचा सामना रंगत ठरला. फुटबॉल आणि रोनाल्डोल प्रेमींसाठी गुरुवारची मॅच रोमांचक ठरली. पोर्तुगालने घानाचा 3-2 असा दणदणीत पराभव केला आहे. पण चर्चा रंगली ती पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोची(cristiano ronaldo). कारण FIFA World Cup 2022 मध्ये रोनाल्डोने इतिहास रचला. 

अशी कामगिरी करणारा पहिला खेडाळू

सामन्याच्या 64 व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनाल्टीवर गोल करत इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा रोनाल्डो जगातील पहिला खेळाडू ठरला. फिफा वर्ल्ड कपच्या 5 एडीसनमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने घानाविरुद्ध 2006, 2010, 2014, 2018 आणि 2022 मध्ये गोल केले आहेत. रोनाल्डोने पेनल्टी कॉर्नरचा चांगला वापर करत कमाल केली आहे. घानाविरुद्ध गोल करताच रोनाल्डोने आपला 118 वा आंतरराष्ट्रीय गोल केला. (fifa world cup 2022 cristiano ronaldo create history Ronaldo becomes the first man to score at five FIFA World Cups Portugal vs Ghana 2022)

दुसरा हाफमध्ये शानदार खेळ 

पोर्तुगालकडून क्रिस्टियानो रोनाल्डो, 78व्या मिनिटाला जोआओ फेलिक्स आणि 80व्या मिनिटाला राफेल लियाओ यांनी गोल केले. पण तिकडे घानाच्या कप्तान आंद्रे एयू  आणि उस्माने बुकारी यांनी भन्नाट गोल केला. पण तरीदेखील हे खेळाडू घानाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

मँचेस्टर युनायटेड क्लबला गुडबाय

पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (cristiano ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबला गुडबाय केलाय. तात्काळ प्रभावाने त्याने क्लब सोडण्याचा निर्णय घेतलाय. क्लबनेही एक निवेदन प्रसिद्ध करुन याला दुजोरा दिलाय. रोनाल्डोने नुकतीच एक स्फोटक मुलाखत दिली होती. ज्यात त्यानं क्लबवर टीका केली होती. या मुलाखतीनंतरच क्लबसाठी खेळणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. मात्र अशातच त्याच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

रोनाल्डोवर का कारवाई करण्यात आली?

यावर्षी एप्रिलमध्ये रोनाल्डोने चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या एका सामन्यात पराभवानंतर तो परतत असताना एका चाहत्याच्या हातातील फोन त्याने खाली टाकला. यामुळे रोनाल्डोचा निषेध करण्यात आला होता त्यानंतर त्याने माफीसुद्धा मागितली होती. 
 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *