Headlines

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

[ad_1]

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारमध्ये वरकरणी पाहता सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट होतं. पण, या स्पर्धेमागचं कतार जे शक्यतो आतापर्यंत कुणाच्याच नजरेत आलं नाही ते धडकी भरवणारं आहे. कारण, FIFA world cup 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर (Human Rights Violation) मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सर्वात भ्रष्ट संस्था असणारं FIFA यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. (FIFA world cup 2022 allegations of worker abuse violations at Qatar stadiums hosting football matches latest news Marathi)

पुन्हा कतारचा काळा चेहरा जगासमोर ?

काही प्रसंग आणि परिस्थितीचे आढावे पाहता कतारची कामगार, समलैंगिकांप्रती असणारी हीन वागणूक ही काही जगासाठी नवी नाही. पण, फिफाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या देशात जाणाऱ्या कामगार/ मजुरांची (Workers and labours ) नेमकी काय अवस्था असते हेच प्रकाशझोतात आलं आहे. याविरोधात अनेक मानवी हक्क संघटना आणि फुटबॉल संघटनांनी आवाजही उठवला आहे. दरम्यान, कतारमधील प्रमुख हुद्द्यांवर असणाऱ्यांनी मात्र ही बाब झिडकारली आहे. 

Equidem नं केलेल्या एका निरीक्षणातून समोर आलेल्या एका माहितीनुसार नोव्हेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 दरम्यानच्या काळातही फिफासाठी उभारल्या जाणाऱ्या 8 स्टेडियममध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन आणि वर्णभेदाच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या निरिक्षणाअंतर्गत आतापर्यंत घेण्यात आलेल्या 60 मजुरांच्या गोपनीय मुलाखतीतून ही माहिती कळू शकली.  

 

निरिक्षणानुसार स्थलंतरित मजुरांनी, (FIFA Stadium) फिफाचे स्टेडियम उभारण्यासाठी मोलाची मदत केली. पण, या कामादरम्यान प्रतिष्ठीत बांधकाम कंपन्यांकडून आपला छळ झाल्याचं म्हणत पावलोपावली मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या घटना घडल्याचं मजुरांनी सांगितलं. सदर मजुरांनी आपल्यासोबत घडल्या प्रकाराविषयी तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, तेव्हा त्यातल्या काहींना थेट कामावरूनच काढण्यात आलं. 

का होत होता भेदभाव? 

21 व्या शतकातही अजून काही असे सामाजिक घटक आहेत, ज्यांना समाजाकडूनच अपमानास्पद वागणूक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. फिफा 2022 च्या दरम्यानही हीच परिस्थिती पाहायला मिळत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. जिथं मजुरांना देशांवरून (Nationaliy), पगार थकवून (Delayed in wages), आरोग्य आणि सुरक्षेच्या (health and securiy) निकषांकडे दुर्लक्ष करत कामाच्या ठिकाणी त्रास दिला गेला. 

(Corona) कोरोना काळातही मजुरांना (Basic health facilities) प्राथमिक आरोग्य सुविधांपासून वंतिच ठेवत FIFA World Cup 2022 च्या आयोजकांनी कहर केल्याचं म्हटलं गेलं. यामध्ये स्टेडियमचं बांधकाम, देखभाल आणि सुरक्षा विभागासाठी करारबद्ध असणाऱ्या कंपन्यांनी मजुरांना वाऱ्यावर सोडल्याच्या चर्चा आहेत. 

शौचालयांमध्येच अंघोळ करण्याची वेळ…

फिफासाठी काम करणाऱ्या काही भारतीय मजुरांच्या मते त्यांना प्रमाणाहून जास्त गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास ठेवण्यात आलं आहे, जिथं त्यांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. काही मजुरांना कोरोनाची लागण होऊनही तिथं त्यांना योग्य उपचार देण्यात आलेले नाहीत. इथं एका खोलीमध्ये 8 ते 10 मजुरांना रहावं लागत असून, त्यांच्यासाठी Bathroom ची व्यवस्था नसल्यातच जमा आहे. परिणामी अनेक मजूरांवर शौचालयांमध्येच अंघोळ करण्याची वेळ आली आहे, अशीही धक्कादायक माहिती मिळत आहे. 

मजुरांवर ओढावलेली ही वेळ पाहता डोकं चक्रावत आहे. थोडक्यात जगापुढे दिखाव्यासाठी कतारनं किंबहुना FIFA नं हा डोलारा उभा केला खरा, पण त्यासाठी राबलेल्या हातांना, मजुरांना किमान आदर- सुविधा दिल्या असत्या तर त्याचं जास्त कौतुक झालं असतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *