थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड म्हणाले, आज दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे जर महिन्याच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा नुकसान भरपाई चा परतावा मिळाला नाही तर पुन्हा कोणतीही पूर्वसूचना न देता या कंपनीच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी शंकर गायकवाड यांनी दिला.

यावेळी श्रीहरी गायकवाड, दयानंद चौधरी, चेतन चौधरी, श्रीराम डिसले, बाळासाहेब गवळी, राजेंद्र फरताडे, पांडुरंग चौधरी, बजरंग चौधरी, सिद्धांत चौधरी, गोटू पाटील, विशाल चौधरी, प्रदीप चौधरी, विजय चौधरी, संदीप चौधरी, वैभव चौधरी, सुभाष चौधरी, बाळू भायगुडे, प्रकाश तानवडे, अमोल चौधरी, अक्षय फरताडे, श्रीधर फरताडे, भास्कर चौधरी, सुमन चौधरी, ऋषिकेश चौधरी, लक्ष्मण चौधरी, प्रितेश तानवडे, सुरेश चौधरी, सखाराम मते, बालाजी चौधरी, धीरज चौधरी, मधुकर चौधरी आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply