Headlines

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी

सांगली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या कृषी दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून सोने काढणारा शेतकरी याचा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज पलूस येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चार शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी केली.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी क्रुषीदिनानिमीत्त प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून आदर्श व उपक्रमशील शेतकरी कृष्णा पवार, अमोल पाटील ,झेंडू मंडले व हनुमंत जाधव या शेतकऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष दगडू जाधव व डॉ. संतोष देसाई यांच्या हस्ते केला.याच वेळी विविध मागण्यांचे फलक हातात धरून शेतकरी विरोधी कायदे रद्द करा.शेतकरी वाचवा,देश वाचवा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे म्हणाले की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित अमलात आणणं आणि शेतकरी विरोधी कायदा रद्द करणं या मागण्या घेऊन देशातील लाखो शेतकरी गेली आठ महिने रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. याची दखल केंद्र सरकारने घ्यावी आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करून भारतातील लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आज कृषी दिनाच्या निमित्ताने आम्ही करीत आहोत. या वेळी प्रगतिशील शेतकरी कृष्णा पवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे कृतिशील लढा उभा केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.डॉ. संतोष देसाई यांनी शेतकऱ्याचे स्वामीनाथन आयोगाबाबत अधिक प्रबोधन होण्याची गरज व्यक्त केली.

ब्रिगेडचे राज्य सल्लागार आदित्य माळी यांनी
फार्मर लेस फार्मिंग ही येऊ पाहणारी पद्धत शेतकर्यांना शेतीतून उद्वस्त करेल याचा धोका वेळीच लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढा तिव्र करावा. अमोल पाटील,हणमंत जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे यांनी केले व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला.त्यानंतर स्व.वसंतराव नाईक यांच्या स्म्रतीस आदरांजली वाहिली. समारोप व आभार महेश मदने यांनी मानले. कार्यक्रमास अंबादास गवळी,सुनिल दलवाई, अहिरे सर,आशिष जाधव,निखील जाधव,अरुण जाधव,विशाल शिरतोडे,विक्रम शिरतोडे,अविष्कार मदने पंकज गवळी,कुणाल यलमारे,सौरभ बुचडे,शिवराज चव्हाण,विराज चव्हाण, इम्रान इनामदार, सह अनेक शेतकरी व तरुण वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *