Farhan Akhtar च्या लग्नानंतर पहिल्या पत्नीवर निशाणा, असह्य झालं म्हणून उत्तर देत म्हणाली…


मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. अतिशय थाटामाटात त्यांनी लग्न केलं आणि पाहता पाहता या जोडीवर चाहत्यांनीही प्रेमाचा भरभरून वर्षाव केला. असं असतानाच एका व्यक्तीचं नावही तितकंच चर्चेत आलं. हे नाव होतं फरहानची पहिली पत्नी, अधुना अख्तर हिचं. (Farhan Akhtar Shibani Dandekar)

प्रतिष्ठीत हेअर ड्रेसर अशी ओळख असणारी अधुना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती.

तिच्यावर वेडीवाकडी टीकाही करण्यात आली. पण, अखेर त्यानंतर जेव्हा ही खिल्ली उडवणं असह्य झालं तेव्हा मात्र अधुनानं सर्वांनाच सडेतोड उत्तर दिलं.

आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्यांना अजिबात थारा न देण्याता अट्टहास जणून तिनं इथं व्यक्त केला. जगा आणि जगू द्या असं म्हणत तिनं सकारात्मकतेला प्राधान्य दिलं.

अधुनानं स्वत:साठी घेतलेली भूमिका पाहता तिला अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही पाठिंबा दिला.

अनेक वर्षांचं नातं तुटलं आणि…

फरहान आणि अधुना यांनी 2000 मध्ये वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती. 2016 मध्ये त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

फरहान आणि अधुना वेगळे झाले असले तरीही त्यांच्या दोन्हीही मुली मात्र या नात्याचे बंध वेगळ्या पद्धतीने जपताना दिसतात.

किंबहुना फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या वेळी, त्याच्या दोन्ही मुलींची हजेरी सर्वांच्या नजरा वळवण्यासोबतच अनेकांची मनंही जिंकून गेली.Source link

Leave a Reply