प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटानंतरही Ex Husband चं नाव घ्यायला घाबरते…


मुंबई :  टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. रश्मी देसाई उत्तरन या मालिकेतून घरोघरी पोहोचली आहे. त्यादरम्यान रश्मीचे नाव या मालिकेतील को-स्टार नंदिश संधूसोबत जोडले जाऊ लागले.

मालिका संपल्यानंतर नंदिश आणि रश्मीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. रश्मी आणि नंदिश यांचे लग्न मोडल्याचा धक्का चाहत्यांना तसेच दोन्ही स्टार्सनाही बसला.

रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही, परंतु अभिनेत्रीने अलीकडेच बिग बॉस 15 मध्ये तिचे लग्न तुटण्याचे कारण सांगितले.

वास्तविक, राखी सावंतने रश्मी देसाईला तिच्या घटस्फोटाचे कारण विचारले, ज्यावर अभिनेत्रीने सुरुवातीला उत्तर देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर रश्मी देसाईने राखीला सांगितले की, तिला याबद्दल बोलायचे नाही. दुसर्‍याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून ती याबद्दल बोलण्यावर विश्वास ठेवत नाही.

बिग बॉस सीजन 15 मध्ये राखी सावंतसोबत बोलत असताना रश्मी देसाई म्हणाली की, तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणे तिला योग्य वाटत नाही. रश्मी यावेळी आपल्या माजी पतीचं नाव घ्यायला देखील घाबरत असल्याचं बोललं जातं आहे. 

ती म्हणते, ‘मला कोणाला दुखवायचे नाही.’ रश्मी असेही म्हणाली, ती इथे सांगू शकत नाही पण तिने घटस्फोट घेतला. तेव्हा राखी सावंत रश्मीला म्हणते, जर तुला कम्फर्टेबल नसेल तर राहू दे. यानंतर रश्मी देसाई प्रतिक्रिया देताना म्हणते, हे संपूर्ण जगाला माहीत नाही, त्याच्याशी दुसऱ्याचे नाव जोडले गेले आहे.

रश्मी देसाईने 2012 मध्ये नंदिश संधूसोबत लग्न केले होते पण चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.Source link

Leave a Reply