प्रसिद्ध अभिनेता कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात, भावूक होत शेअर केला व्हिडिओ


मुंबई :  ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता विभू राघवे याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  या व्हिडिओनंतर  चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. वास्तविक अभिनेता आणि ब्लॉगर विभू राघव कॅन्सरशी झुंज देत असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यात आहे.

अभिनेत्याने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खुलासा केलाय की, तो स्टेज IV कर्करोगाने ग्रस्त आहे. तेव्हापासून त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

‘निशा और उसके कजिन्स’मध्ये अनेरी वजानीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या विभू राघवने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याला स्टेज-4 कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. व्हिडिओमध्ये विभूने आपलं दुःख लपवलं असून, गेल्या काही दिवसांपासून मी आजारी असल्याचं त्याने सांगितलं आहे.

उपचारा दरम्यान असं आढळून आलं आहे की, मला स्टेज 4 कर्करोग आहे. जो प्रगत अवस्थेत आहे आणि हा कर्करोगाचा खूप वेगळा आणि आक्रमक प्रकार आहे. विभू पुढे म्हणाला, मला कधीच वाटलं नव्हतं की, मला अशा प्रकारचा रोग कधी घेरेल, एका दिवसात आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. हे सगळं असूनही मी खंबीर होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

विभूच्या व्हिडिओवर त्याचे मित्र आणि  त्याचे सहकलाकार शालीन मल्होत्रा, मोहसीन खान, झैन इमाम, मोहित मलिक यांनी कमेंट केली आहे. मोहित मलिकने कमेंट करत लिहिलंय की, विभू मजबूत राहा. लवकरच आम्हाला तुला पुन्हा पडद्यावर पाहयचं आहे. त्याचबोरोबर झैन इमामने लिहिलं, भाऊ, हसत राहा, मी तुमच्यासाठी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतोय. विभू राघवेने 2016 मध्ये रोमँटिक फिल्म रिदम आणि 2017 मध्ये पिचफोर्क या हॉरर फिल्ममध्येही काम केलं आहे.Source link

Leave a Reply