Fact Check : ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच होणार दुसऱ्यांदा आई?


मुंबई : बच्चन कुटुंब हे बॉलीवूडचे असंच एक कुटुंब आहे जे सर्वांना माहित आहे. या कुटुंबातील जवळपास सर्वच लोक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार राहिले आहेत. या कलाकारांमध्ये स्वतः अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब रोजच चर्चेत असतं. आता नुकतंच अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा होणार असल्याची बातमी समोर आली असून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा मुलाला जन्म देणार असल्याची चर्चा सुरु आहे.

नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आली आहे. ऐश्वर्या रायचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंवरुन ऐश्वर्या राय दुस-यांदा आई होणार आहे असं म्हटलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा आई होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. आत्तापर्यंत ऐश्वर्या किंवा तिच्या कुटुंबीयांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनचे काही फोटो समोर आले आहेत. ऐश्वर्या रायचे वाढलेलं वजन आणि तिचा बेबी बंप या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून लोकं असाही अंदाज लावत आहेत की, ऐश्वर्या लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

ऐश्वर्या राय बच्चनचे हे फोटो प्रसिद्ध पत्रकार विरल भयानी यांनी शेअर केले होते. एका शूटदरम्यान ऐश्वर्या, अभिषेक आणि मुलगी आराध्या सरथ कुमारच्या घरी पोहोचले होते. हा फोटो यावेळचा आहे. ज्यात फोटोंमध्ये ऐश्वर्या रायने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने यासोबत कोणताही मेक-अप केला नाही जरी फोटोंमध्ये ऐश्वर्याचं वजन वाढलेलं दिसतं आहे. यासोबतच हा फोटो नीट पाहिल्यास यामध्ये तिचा बेबीबंप स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्याला पाहून लोक ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधू लागले आहेत. मात्र हा फोटो  पुन्हा एकदा व्हायरल होत असला तरी ऐश्वर्याचा हा फोटो जुना आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंवर कमेंट करत अनेक सोशल मीडिया यूजर्सनी लिहिलं आहे की, ‘ऐश्वर्या प्रेग्नंट आहे का?’ दुसर्‍याने लिहिलं, ‘गुड न्यूज, ऐश्वर्या प्रेग्नंट आहे.’ त्याचप्रमाणे, इतर अनेक युजर्सनी असाच अंदाज लावला आहे.  2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला. आराध्या बच्चन आता ९ वर्षांची आहे.Source link

Leave a Reply