Facebook Tips: भन्नाट ट्रिक! कोण कोण तुमचे फेसबुक प्रोफाइल गुपचूप पाहत आहे ‘असे’ घ्या जाणून


नवी दिल्ली:Facebook Tips: सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केवळ कॉल व मेसेजसाठीच नाही तर इतर कामांसाठी देखील फोनचा वापर केला जातो. स्मार्टफोन व इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने सोशल मीडिया वापरणाऱ्या यूजर्सची संख्या देखील वाढली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर दिवसभर करतो. सोशल मीडियावर आपण इतर अनोळखी लोकांशी देखील जोडले जातो. फेसबुक देखील असाच एक प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही फोटो-व्हिडिओ शेअर करण्यापासून ते आपले विचार मांडू शकता. फेसबुकवर सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. मात्र, अनेकजण गुपचूप इतरांचे प्रोफाइल चेक करत असतात. तुम्हाला देखील तुमचे फेसबुक प्रोफाइल व फोटो कोण कोण पाहत आहे जाणून घ्यायचे असेल तर यासाठी सोपी ट्रिक उपलब्ध आहे. या ट्रिकविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास वारंवार चार्ज करण्याची गरजच नाही

तुमचे फेसबुक प्रोफाइल कोण पाहत अशाप्रकारे घ्या जाणून

  • तुमच्या फेसबुक प्रोफाइल फोटोला कोण पाहत आहे, हे जाण्यासाटी सर्वात प्रथम फेसबुकचे वेब व्हर्जन तुमच्या डेस्कटॉपमध्ये ओपन करा.
  • यानंतर वेब व्हर्जनवर जाऊन फेसबुकच्या आयडी व पासवर्डने लॉग इन करा.
  • फेसबुक लॉग इन केल्यानंतर राइट क्लिक करा. येथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. यातील व्ह्यू सोर्स या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला कीबोर्डवर ‘कंट्रोल+एफ’ हे बटन दाबायचे आहे. त्यानंतर सर्चमध्ये जाऊन ‘बडी आयडी’वर क्लिक करा. आता एक नवीन टॅब ओपन करा.
  • त्यानंतर यूआरएलच्या जागी ‘Facebook.com/15-digit ID’ लिहून एंटर करा. आता तुमच्या समोर तुमचे फेसबुक प्रोफाइल पाहणाऱ्या यूजर्सचे प्रोफाइल असे. अशाप्रकारे, तुम्ही अगदी सहज तुमचे फेसबुक प्रोफाइल गुपचूप पाहणाऱ्या यूजर्सला शोधू शकता.

वाचा: सोशल मीडिया यूजर्संनी हे नियम पाळावे, मोदी सरकारकडून ‘अलर्ट

वाचा: Best Plans: स्वस्तात जास्त व्हॅलिडिटी ! जिओचे ८४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि इतर बेनेफिट्ससह येणारे ‘ हे’ प्लान्स आहेत जबरदस्त

Source link

Leave a Reply