Headlines

ex mp subhash Wankhede criticized Navneet rana on uddhav thackrey comment rno news

[ad_1]

“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास आगामी २०२४ मधील निवडणुकीत आम्ही राणांना त्यांची जागा दाखवून देऊ”, अशी टीका वानखेडे यांनी केली आहे.

“तू ठाकरे है, तो मैं भी….”; नवनीत राणांची एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या, “आता कळेल,…”

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. नवनीत राणा या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंध भक्त आहेत. आगामी निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच राणांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. नवनीत राणा या अज्ञानी आहेत. त्यांना कुठलाही अनुभव नाही, असा हल्लाबोल वानखेडे यांनी केला आहे. “मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे. आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे”, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता.

Photos : ‘मला शिकवू नका’ ते ‘फोन रेकॉर्ड करण्याचे आदेश सरकारने दिले का?’; अमरावतीत नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये काय घडलं? वाचा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या इशाऱ्यावर नाचतात, अशी टीकादेखील नांदेडमध्ये बोलताना सुभाष वानखेडे यांनी केली आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे हा मेळावा उद्धव ठाकरेच घेणार, असे वानखेडे यांनी यावेळी ठासून सांगितले.  ‘ना भूतो ना भविष्यती’ असा यंदाचा दसरा मेळावा होईल, असे वानखेडे म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *