दर दहा वर्षांत एक मुल; सैफच्या ‘वडिल’कीवर पहिल्यांदाच हे काय बोलून गेली करिना?

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान ही सध्या तिच्या बॉलिवूड कारकिर्दीसोबतच कुटुंबावरही लक्ष देताना दिसत आहे. तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान, अशा दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आता करिना आणि सैफचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. (Kareena Kapoor)

सैफची बाबा होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी त्यानं लग्न केलं होतं. तिच्यापासूनच्या नात्यात त्याला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं झाली. 

एकिकडे सारा ही सैफची सर्वात मोठी लेक 26 वर्षांची असतानाच दुसरीकडे जहांगीर हा त्याचा सर्वात लहान मुलगा अवघ्या एक वर्षाचा आहे. 

आपल्या पतीला प्रत्येक दशकात म्हणजे दर दहा वर्षांनी एक मुल होत असल्याचं म्हणत करिनानंही नुकतीच त्याची खिल्ली उडवली. 

एका मासिकाशी संवाद साधताना तिचं हे वक्तव्य समोर आलं. ‘सैफला प्रत्येक दशकामध्ये एक मूल आहे. 20, 30, 40 आणि आता 50 वर्षांच्या वयातही त्याला मूल आहे. मी आताच सांगून ठेवलंय तुझ्या साठीमध्ये काही हे शक्य नाही…’, असं ती म्हणाली. 

सैफ या नात्याता आपला मोठा आधार असल्याचं करिना म्हणाली. मुलांचा सांभाळ करण्यात मदत करण्यापासून तो किला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठीही प्रोत्साहन देताना दिसतो, असंही तिनं सांगितलं. 

सैफ हा तैमुरचा खास मित्र असल्याचं सांगत तिनं या वडील- मुलाचं हे सुरेख नातं सर्वांसमोर आणलं. 

दुसऱ्या गरोदरपणात आपल्याला अनेकांचं बोलणं ऐकावं लागल्याचं करिना म्हणाली. कोरोना काळातील गरोदरपणा, त्यातही सुरु असणारं चित्रीकरण या साऱ्यामुळं तिच्यावर निशाणाही साधला गेला. पण, तिनं मात्र हे नाही व्हायला पाहिजे होतं, इतकंच म्हणत बोल लगावणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *