“आम्ही 365 दिवस खेळू इच्छितो, पण..” झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया


India Vs Zimbabwe ODI: झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वे संघाला फलंदाजीचं आव्हान दिलं. पण झिम्बाब्वेचा संघ 30 षटकं आणि 5 चेंडू खेळत 189 धावांवर आटोपला. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य सहज गाठलं. शिखर धवन आणि शुभमन गिल या दोघांनीही या सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या. या विजयानंतर कर्णधार केएल राहुल याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

“दुखापतीनंतर मैदानात परतल्याचा आनंद होत आहे. आम्ही खूप क्रिकेट खेळतो आणि  दुखापत हा एक खेळाचा भाग असेल. खेळापासून दूर राहणे कठीण असतं. त्यामुळे मैदानात परतेपर्यंत सर्वकाही कंटाळवाणे होते. फिजिओसोबत राहण्यापेक्षा आम्ही 365  दिवस खेळू इच्छितो. आमच्यापैकी काही जणांना भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परतण्याचा आनंद आहे.” असं कर्णधार केएल राहुल याने सांगितलं. 

झिम्बाब्वेकडून रेगिस चकाबवाने 35, रिचर्ड नागरवाने 34 आणि ब्रॅड इव्हान्सने 33 धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि दीपक चहर यांनी 3-3 बळी घेतले.   

झिम्बाब्वे संघ: तदीवानाशे मारुमनी, इनोसेंट कॅया, सीन विलियम्स, वेस्ले मधेवेरे, सिकंदर रझा, रेजिस चकबवा (कर्णधार), रयान बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इवांस, विक्टर न्याउची, रिचर्ड नगारवा

भारतीय संघ: शिखर धवन, शुभमन गिल, ईशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, संजू सैमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराजSource link

Leave a Reply