English speaking : इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर, ही 30 वाक्य लक्षात ठेवा आणि मित्रांमध्ये स्मार्ट बना


मुंबई : बऱ्याचदा लोकांना इंग्रजी बोलता, येत नसल्यामुळे लोक ऑफिसमध्ये किंवा बाहेर कोणासोबतही बोलताना 2 वेळा विचार करतात. तसेच इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकांचा कॉन्फिडंट विक होतो. लोकांना इंग्रजी शिकणं अवघड वाटतं, त्यामुळे ते शिकण्यासाठी देखील घाबरतात, आपल्याला जमेल, नाही जमेल, असा लोकांना प्रश्न पडतो. परंतु तुम्हाला माहितीय का जर तुम्ही निट समजून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते तितकेसे अवघड नाही.

बेसिकपासून सुरुवात करून तुम्ही चांगले इंग्रजी बोलायला शिकू शकता. यासाठी कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूट किंवा इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये सहभागी होऊन भरमसाठ फी भरण्याची गरज नाही.

फक्त तुम्ही अशा शब्दांची आणि वाक्यांची माहिती करुन घ्या, ज्याचा वापर तुम्हाला रोजच्या वापरात होऊ शकतो आणि तेच महत्वाचं असतं. फक्त तुम्हाला रोजच्या वापरातले शब्द शिकला आले की, झालंच. तुम्ही बघा मग कसे, पटापट इंग्रजी बोलू लागाल.

या लेखात आम्ही तुम्हाला अशी 30 वाक्ये सांगणार आहोत, जी समजून घेऊन आणि लक्षात ठेवून तुम्ही इंग्रजी बोलायला शिकू शकता.

आम्ही तुम्हाला हे शब्द आणि त्याचं मराठी भाषांतर सांगणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला हे शब्द समजून घेणं, जास्त सोप होईल. शाळा असो किंवा कॉलेज असो किंवा मग ऑफिस. तुम्ही ही वाक्ये तुमच्या वहीत लिहू शकता किंवा हे पान बुकमार्क करू शकता. मग दिवसातून एकदा त्याची उजळणी करा. त्याच्या मदतीने तुम्ही बेसिक इंग्लिश सहज शिकू शकता.

Marathi to English Translation: रोज उपयोगाचे असलेले शब्द
ते कंस– How that? कोणी सांगितलं – Who said? कशा संदर्भात – About what? कोणा संदर्भात – About whom? कसं काय – In what way?

काय विचारायचंय – What to ask? काय बोलायचंय / काय बोलू – What to say? काय करायचंय – What to do? काय वाचायचंय – What to read? काय प्यायचं आहे – What to drink? काय खायचंय – What to eat? काय ऐकायचं आहे – What to listen? काय विकत घ्यायचं आहे – What to purchase? किंवा What to buy?

काय आणायचंय – What to bring? काय दाखवायचंय – What to show? काय घालायचंय – What to wear? काय बघायचंय/ काय पाहायचंय – What to watch? किंवा What to see? काय प्रॉबलम आहे – What a bother?

हे घ्या – Take it. लवकर या – Come fast. उशीरा नका करु – Don’t be late. प्रयत्न करा – Keep trying. नाही म्हणजे नाही – No means No. हा नक्कीच – Yes, sure. नाही मी नाही आहे – No, I am not. नाही कधीच नाही – No, not at all.

तुमचे हात धुवा – Wash your hand. माझं पोट भरलंय – I am full. माझं डोकं दुखतंय – I have head ache.Source link

Leave a Reply