ENG vs IND | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! टीम इंडियात लवकरच परतणार हा खेळाडू


मुंबई : टीम इंडिया 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आलं. आता टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियातील एक स्टार खेळाडू दुखापतीमधून बरा होत आहे. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे. 

स्टार ओपनर के एल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर गेला होता. आता क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. के एल राहुलने दुखापतीवर जर्मनीत जाऊन उपचार घेतले आहेत. त्याने स्वत: ट्वीट करून याची माहिती दिली. के एल राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

मी ठिक आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद, लवकरच भेटू असं कॅप्शन फोटो शेअर करत के एल राहुलने दिलं आहे. के एल राहुल मैदानात कधी परतणार यावर अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. 

केएल राहुलही दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला. राहुलने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. राहुलच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे तो टीमसाठी गेम चेंजर ठरू शकतो. राहुलने भारतासाठी 43 कसोटी, 42 वनडे आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये लखनऊ टीमचा कर्णधार आहे.

2020-21 मध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची सीरिज खेळवण्यात आली. टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2 कसोटी सामने जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेतली, कोरोनामुळे एक सामना स्थगित करण्यात आला. हा सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व बुमराह करणार आहे. हा सामना जिंकवणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं असणार आहे. हा सामना जिंकला तर सीरिज जिंकू. टीम इंडियाकडे हुकमी एक्के आहेत त्यामुळे हा सामना टीम इंडिया जिंकू शकते. 

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया टीम 
जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , प्रसिद्ध कृष्णा.Source link

Leave a Reply