Headlines

ENG vs IND, 2nd T20I : भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी विजय

[ad_1]

बर्मिंगहॅम : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका (ENG vs IND, 2nd T20I) जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. (eng vs ind 2nd t20i team india beat england by 49 runs and win series at edgbaston)

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 171 धावांचे आव्हान दिले होते. मात्र  भारतीय गोलंदाजांनी गोऱ्या साहेबांना 17ओव्हरमध्ये 121 धावांवरच गुंडाळलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तर डेव्हिड विलीने नाबाद 33 रन्स केल्या. मात्र तो टीमला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला. 

टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने जॉस बटलर, जेसन रॉय आणि रिचर्ड या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि हर्षल पटेल या जोडीने 1-1 विकेट गोलंदाजांना चांगली साथ दिली.

रोहितच्या नेतृत्वात पाचवा विजय 

टीम इंडियाचा रोहितच्या शर्माच्या नेतृत्वातील हा एकूण पाचवा टी 20 मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत रोहितच्या कॅप्टन्सीत अनुक्रमे न्यूझीलंड, विंडिज, श्रीलंका, आयर्लंड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे रोहितने पुन्हा एकदा आपल्याला यशस्वी कर्णधार का म्हटलं जातं, हे सिद्ध केलंय. 

दरम्यान या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 10 जुलैला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा तिसरा सामना जिंकून गोड शेवट करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन  ;  रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन आणि मॅथ्यू पार्किन्सन.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *