ऐन दिवाळी सुट्टीत पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी



ऐन दिवाळी सुट्टीत पुणे- सातारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. खंबाटकी घाटातील वाहतूक सकाळीच बोगदया मार्गे वळविण्यात आली महामार्ग पोलीस, शिरवळ, खंडाळा, भुईंज, सातारा पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा- पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पटीने वाढ, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निर्णय!

साताऱ्याकडे येणाऱ्या सातारा बाजूकडून जाणारा खंबाटकी घाट आज (शनिवार) सकाळ पासून ठप्प झाला आहे. घाटात दत्त मंदिराजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. पारगाव-खंडाळापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सध्या इतर मार्गानं वाहतूक वळवण्यात येत आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्यामुळं वाहनांच्या रांगा सात ते आठ किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत. सध्या केसुर्डी (ता. खंडाळा) पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी घाटाकडे वाहतूक बोगद्या मार्गे वळवण्यात आली.

हेही वाचा- Video: पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!

रस्त्यावर उतरलेल्या ववाहनांची संख्या पाह्ता महामार्ग सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस फरांदे, सनस, तसेच महामार्ग पोलीस महामार्गावर उपस्थित आहेत.आने वाडी टोल नाक्यावरही वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त करत प्रवास केला.सायंकाळ पर्यत वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.

Source link

Leave a Reply