बिहारमध्ये इम्रान हाश्मी आणि सनी लियोनीचा मुलगा? नक्की काय आहे प्रकरण…


मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या चर्चा कायम रंगत असतात. अता एका गंभीर गोष्टीमुळे सीरियल किसर म्हणून ओळख असलेला अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी तुफान चर्चेत आले आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील एका विद्यार्थाने सनी आणि इम्रान त्याचे आई-वडील असल्याचं सांगितलं आहे.  

विद्यार्थाने परीक्षा फॉर्म भरताना वडिलांच्या जागी इम्रान हाश्मी आणि आईच्या जागी सनीचं नाव लिहिलं आहे. तो एवढ्यावर थांबला नाही,  तर त्याने जन्मठिकाण चतुर्भुज लिहिलं आहे. 

Emran Sunny

चतुर्भुज हे ठिकाण मुज्जफरपूरमधील रेड लाईट एरिया म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फॉर्मची माहिती मिळताच बिहार विद्यापीठात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी परीक्षा नियंत्रक डॉ मनोज कुमार यांनी ‘विद्यार्थ्याने असं मस्करी म्हणून केलं असेल. मात्र, फॉर्म बनावट देखील असू शकतो…’ असं सांगितलं आहे.  हे प्रकरण 2020 सालचं आहे. 

यावर काय म्हणाला इम्रान? 

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इम्राने देखील ट्विट करत, ‘शपथ घेवून सांगतो, तो माझा मुलगा नाही…’ असं म्हणाला आहे. सनीने देखील याप्रकरणी ट्विट केलं, ती म्हणाली, ‘भन्नाट मुलगा आहे… आयुष्यात मोठं होण्यासाठी स्वप्न पाहात आहे….’

 Source link

Leave a Reply