पात्र नागरिकांनी, फ्रंट लाईन वर्कर्सनी लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा – पालकमंत्री जयंत पाटील

 सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचाराखाली 1 हजार 607 रूग्ण असून यापैकी 23 रूग्ण ऑक्सिजनवर तर 6 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  कोविडच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी दुसरा डोस घेवून ज्यांना 9 महिने पूर्ण झाले आहेत, अशा 60 वर्षावरील नागरिकांनी, फ्रंट लाईन वर्कर्सनी लवकरात लवकर बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही त्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. ‍मिलींद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

किशोरवयीन मुलांच्या लसीकरणामध्ये जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याबद्दल  अभीनंदन करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी  लसीकरणाला  प्रतिसाद काहिसा कमी आहे, अशा ठिकाणी यंत्रणांनी  अधिक प्रयत्न करावेत.  कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Source link

Leave a Reply