Headlines

Electricity Bill: वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी, आजच थांबवा ‘या’ डिव्हाइसेसचा वापर

[ad_1]

नवी दिल्ली: Tips To Reduce Electricity Bill: आजकाल प्रत्येक घरात Electronic Devices चा वापर वाढला असून यामुळे वाढते लाईट बिल अनेकांची डोकेदुखी बनले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला घराचे वीज बिल कमी करायचे असते. परंतु, अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे हे शक्य होत नाही.पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. हे उपकरण काढून टाकल्यानंतर किंवा त्यांचा वापर कमी केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराचे वीज बिल कमी करू शकता. तुम्हाला यात कोणतीही अडचण येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गांनी बिल कमी करता येईल.

वाचा: Smartphone Sale: Xiaomi 12 Pro वर १५,००० रुपयांपर्यंतचा ऑफ, Redmi स्मार्टफोन्सही स्वस्तात मिळणार, उद्यापासून सेल

स्वयंपाकघरातील चिमणी:

चिमणीचा वापर सामान्यतः स्वयंपाकघरात केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का ? की सर्वात जास्त वीज बिल घेणार्‍या उपकरणांच्या यादीत चिमणी समाविष्ट आहे. उन्हाळ्यात चिमणीचा वापर एक प्रकारे आवश्यक असतो. पण, त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. कारण, त्याच्या जागी बाजारात इतर अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही चिमणीच्या ऐवजी वापरू शकता. शिवाय त्याचा वापर केल्याने वीज बिलही खूप कमी येते.

वाचा: Smart TV Discount : अवघ्या ५ हजारात घरी न्या ४० इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीवी, खरेदीसाठी होतेय ग्राहकांची गर्दी

गीझर सुद्धा भरपूर वीज वापरतो:

गीझरमुळे घरातील वीजही खूप जाते. अशा परिस्थितीत, आपण खूप सावध असणे आवश्यक आहे. विशेषत: इलेक्ट्रिक गिझरचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच आपण त्याऐवजी दुसरा पर्याय शोधणे फार महत्वाचे आहे. त्याऐवजी गॅस गिझर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. इलेक्ट्रिक गिझरऐवजी तुम्ही गॅस गिझर वापरू शकता. हे डिव्हाइस चांगल्या परफॉर्मन्ससोबत विजेचीही खूप बचत करते.

इन्व्हर्टर एसी:

घरातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांच्या यादीत AC चा समावेश आहे. पण, हे एक उपकरण आहे. जे तुम्ही घरातून काढू शकत नाही. पण तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसीऐवजी इन्व्हर्टर एसी वापरू शकता. इन्व्हर्टर एसी म्हणजे विजेची उत्तम बचत करणे. कारण, त्याच्या आउटडोअरमध्ये पीसीबी असतो. जो कंप्रेसरचा वेग नियंत्रित करतो. कंपनीचा दावा आहे की इन्व्हर्टर एसी १५ % विजेची बचत करते.

वाचा: Laptop Deals: लॅपटॉप खरेदी करायचाय ? पाहा ही ऑफर, ब्रँडेड लॅपटॉप्सवर मिळतोय तब्बल ३६ हजारांपर्यंतचा डिस्काउंट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *