Electricity Bill: उन्हाळ्यात वाढत्या वीज बिलाच्या टेन्शनपासून असे व्हा फ्री, बिल येणार अर्ध्यापेक्षा कमी, फक्त बदला घरातील ‘हे’ २ गॅजेट्स


नवी दिल्ली: Tips ToReduce Electricity Bill:सध्या घरोघरी Eelectric Devices चा वापर खूप वाढला आहे. त्यात आता उन्हाळा असल्याने प्रत्येकाच्या घरी AC, Coolers सारखे कुलिंग डिव्हाइसेस देखील तासनतास सुरू असतात. या सगळ्यांमुळे उन्हाळ्यात थंड वारा तर मिळतो. पण, त्याचा भार मात्र खिशावर येतो. उन्हाळ्यात वीज बिल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दिवस-रात्र एसी-कूलर चालवल्याने जास्त वीज लागते. अशा परिस्थितीत बिल कमी करण्यासाठी सगळेच विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत करतात. पण, योग्य माहिती आणि वेळेच्या कमतरतेमुळे अनेक वेळा नेमक्या अशाच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला वीज बिल कमी करण्याच्या काही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत.

वाचा: Smartphone Launch: कर्व्ड डिस्प्लेसह २ शानदार स्मार्टफोन्स लाँच, फोन्समध्ये १६ GB पर्यंत रॅम आणि १०० MP कॅमेरा, पाहा किंमत

करा हे बदल:

साधारणपणे उन्हाळ्यात वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल वाढले की, बजेट बिघडते. जर तुम्हाला जास्त वीज बिलाची समस्या येत असेल तर, तुम्हाला फक्त घरातील काही डिव्हाइसेस बदलावी लागतील. हे डिव्हाइसेस तुमचे बिल नियंत्रणात आणू शकतात.

सामान्य बल्ब विजेचा वापर वाढवतो:

तुम्ही अजूनही जुने बल्ब वापरत असाल तर त्यांना बाय म्हणण्याची हीच योग्य वेळ आहे. हे बल्ब विजेचे बिल झपाट्याने वाढवतात. त्यांच्यापासून फ्री होऊन, तुम्ही वीज वापर कमी करू शकता. त्याऐवजी घरात LED BULB वापरणे सुरू करा. एलईडी बल्ब विजेचा वापर कमी करून तुम्हाला मोठ्या बिलांपासून वाचवू शकतो. परिणामी विज बिलात मोठी कपात दिसून येते.

अशा प्रकारचे एअर कंडिशनर वापरणे टाळा:

उन्हाळ्याच्या दिवसात AC चा वापर सर्रास होतो. जर तुम्ही जास्त क्षमतेचा एसी वापरत असाल तर., काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फक्त गरजेच्या वेळीच AC चालू करा. उच्च क्षमतेचे एसी मोठ्या प्रमाणात वीज वापरतात आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसून येतो.

जुन्या पद्धतीचा AC :

आजही अनेक घरांमध्ये जुन्या पद्धतीच्या AC वापरला जातो. त्यामुळे खूप वीज लागते. विजेचा जास्त वापर केल्यास बिलात वाढ होईल. त्यामुळे जुन्या एसीऐवजी आजच 5 Star Rating AC असलेला नवीन AC घ्या. ५ स्टार रेटिंग असलेले AC कमी वीज वापरतात. ज्यामुळे तुम्ही तुमचे वीज बिल कमी करण्यात मदत करू शकतात.

वाचा: Foldable Phones: राहा तयार ! भारतात लवकरच एन्ट्री करणार सॅमसंगचे नवीन फोल्डेबल फोन आणि वॉच, पाहा डिटेल्स

वाचा: Cashback Tips: ऑनलाईन खरेदी करताना ‘या’ खास वेबसाईट्सची घ्या मदत, मिळणार मोठा कॅशबॅक, होणार सेव्हिंग

वाचा: Smart Tv: ३२ इंचाचा Smart TV स्वस्तात न्या घरी, ११,००० पर्यंत बचत करण्याची संधी, TV चा साउंड सिनेमा हॉल सारखा

Source link

Leave a Reply