Headlines

election-commission-has-ordered-shinde-group-and-uddhav-thackeray to prove-majority-by-august-8 | Loksatta

[ad_1]

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरील हक्कावरुन सुरु असलेली लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत गेला आहे. आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही कोणाकडे राहणार याबाबतही ८ ऑगस्टला फैसला होणार आहे.

हेही वाचा- “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

धनुष्यबाणावरही शिंदे गटाचा दावा

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. बंडानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात आला आहे.

हेही वाचा- जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वॉरंट; राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच गुन्हा नोंद

शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

याबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आधी सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरु होती आता हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. निवडणूक आयोग दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेऊन आपला निर्णय जाहीर करेल. यासाठी दोन्ही बाजूच्या गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची याबाबतचा निकाल



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *