एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “आजकाल मुख्यमंत्र्यांनाही…” | congress leader yashomati thakur comment on eknath shinde death threatमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणारा एक फोन कॉल आल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर दुसरीकडे या धमकीप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असून सर्वपक्षीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात दर्जेदार राजकारण व्हावे, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली. ‘एबीपी माझा’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

महाराष्ट्राची अवस्था अशी झाली आहे, की आजकाल मुख्यमंत्र्यांनाही धमकीचा फोन येत आहे. ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अफवा पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत दर्जेदार राजकारण केलेले आहे. यापुढेही महाराष्ट्राकडून असेच राजकारण होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे यशोमती ठाकुर म्हणाल्या.

हेही वाचा >> “…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य

मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी या प्रकरणाची देशतील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी केली. “एकनाथ शिंदे यांना जर धमकीचे फोन आले असतील, तर मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. तसेच उच्चस्तरीय चौकशीनंतर तपासात उघड झालेल्या बाबी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड कराव्यात,” असे विनायक राऊत म्हणाले.Source link

Leave a Reply