eknath shinde group mla sanjay gaikwad slams aaditya thackerayउद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सध्या बुलढाण्यात शेतकरी संवाद यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधत आहेत.त्यासोबतच, आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. विशेषत: आदित्य ठाकरेंनी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना ‘चुन चुन के मारेंगे’ या वक्तव्यावरून आव्हान दिलं होतं. त्यावरून संजय गायकवाडांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या खांद्यावरून लोणार सरोवर फिरायला घेऊन गेलो होतो, असं गायकवाड म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंचं संजय गायकवाडांना आव्हान!

शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या विविध धोरणांवर टीकास्र सोडलं आहे. यादरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सरकारला लक्ष्य करताना सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी केली. “ते म्हणाले होते चुन चुन के मारेंगे. चला, मी चॅलेंज देतो. मी एकटा चालत येतो तुमच्या मतदारसंघात, तुम्ही समोरून एकटे चालत या”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सोमवारी संजय गायकवाड यांनाही थेट आव्हान दिलं होतं.

“आम्ही फक्त बोललो नाही, करून दाखवलं”

दरम्यान, संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे काही नेते सारखं माझं नाव घेत आहेत. चुन चुन के मारेंगे असं भाष्य करत असल्याचं सांगतात. मी हे वाक्य बोललो आहे हे मी नाकारत नाही. पण मी कुणाबद्दल बोललो? जे स्थानिक लोक गलिच्छ भाषेत आमची टिंगल टवाळी करतात, अशा लोकांबद्दल आम्ही बोललो. आणि आम्ही बोललोच नाही, तर आम्ही ते करूनही दाखवलं”, असं म्हणत संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”, सुप्रिया सुळेंची अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया; ट्विटरवरून केलं आवाहन!

“आदित्य ठाकरेंनी जरी मारामारीची भाषा केली असली, तरी..”

“काल आदित्य ठाकरे म्हणाले की मी बुलढाण्याला चाललो आहे. चुन चुन के मारो म्हणणाऱ्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी समोरून एकटं यावं. मला आठवतंय की २००२ मध्ये मी माझ्या खांद्यावर आदित्य ठाकरेंना लोणारच्या सरोवरावर घेऊन गेलो होतो. ठाकरे परिवाराचा आम्ही आदर करतो. मी कधीही लहान मुलांच्या अंगावर हात उचलत नाही, उचललेला नाही. माझी ओळख आहे की मी अन्यायाच्या विरोधात लढतो. मी आजपर्यंत खूप मोठ्या लोकांशी टक्कर दिली आहे. आदित्य ठाकरे वगैरे माझ्यासाठी लहान आहेत. त्यांनी जरी भांडणाची किंवा मारामाऱ्यांची भाषा केली असली, तरी मी ती करत नाही”, असं गायकवाड म्हणाले.Source link

Leave a Reply