एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोहन भागवत यांची भेट | Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets Mohan Bhagwat at Mumbai RSS office

[ad_1]

राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. कोणाला किती जागा आणि खातेवाटप यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिन्याभरात अनेकदा दिल्लीची वारी केली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनिश्चितता असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> “या पोराला काही शिकवलंय की नाही, गल्लीबोळात हिंडत होतं की काय?” ‘झाडी डोंगार’वाले शहाजीबापू पुन्हा आक्रमक

मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत आरएसएसच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी मोहन भागवत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकरुपी भेट दिली. शिंदे-फडणवीस आणि मोहन भागवात यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>>खंजीर, छाती, पाठ आणि गद्दार; आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात सभा, बंडखोर गटावर टीकास्त्र

या भेटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे. ” देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तसेच मी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहन भागवत यांची पहिल्यांदाच भेट घेतली. याआधीही मी त्यांना भेटलेलो आहे. आमचे सरकार हिंदुत्व या समान विचारधारेला घेऊन स्थापन झालेले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> “भाजपासोबत जे गेले, त्यांनी गुलामी पत्करली” उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, या भेटीत शिंदे-फडणीस आणि मोहन भागवत यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *