Headlines

eknath khadse slams girish mahajan bjp jalgao politics

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दूधसंघाची निवडणूक लढवून दाखवण्याच्या दिलेल्या आव्हानावर आता खडसेंनी गिरीश महाजनांना जाहीर आव्हान दिलं आहे. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर टीकास्र सोडलं.

कारनाम्यांवरून दावे-प्रतिदावे

“खडसेंचे कारनामे लवकरच समोर येतील. खडसेंना संपूर्ण जळगाव जिल्हा ओळखतो. त्यांना आता भरपूर वेळ आहे. म्हणून ते रोज बोलत असतात. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम त्यांनी करत राहावं. माझं काम लोकांसमोर आहे. मात्र, त्यांनी जे केलंय ते लवकरच समोर येईल”, असं म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लक्ष्य केलं होतं. त्यावरून खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमच्यात हिंमत असेल, तेवढे कारनामे काढा माझे. मी तर आव्हान देणारा माणूस आहे. आत्तापर्यंत तुम्ही कारनामे का नाही काढले? आता तर तुम्ही मंत्री आहात”, असं खडसे म्हणाले आहेत.

“आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही”

दरम्यान, खडसेंनी निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान देणाऱ्या गिरीश महाजनांना खडसेंनी प्रतिआव्हान दिलं आहे. “मी जेव्हापासून राजकारणात आलो, तेव्हापासून एक १९७७ ची निवडणूक वगळता, कोणत्याही निवडणुकीत कधीच हरलेलो नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मी सातत्याने सहा वेळा निवडून आलो. मला तिकीट दिलं नाही, तर निवडून येण्याचा विषयच नाही. तिकिट दिलं असतं, तर मी निवडून आलो असतो. गिरीश महाजनांना म्हणावं, मी निवडून येण्याची भिती होती, म्हणून आग्रह करून तुम्ही मला तिकीट दिलं नाही. तुमचा एक कट होता. मला आजही तिकीट द्या. मग निवडून येतो की नाही पाहा. मग म्हणा निवडून तरी या. मी आयुष्यात कधी हरलो नाही”, असं खडसे यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये कलगीतुरा, “लवकरच खडसेंचे कारनामे समोर येतील” महाजनांचा सूचक इशारा

“एकटं लढणं हीच खरी ताकद आहे. आज तुमच्याकडे सत्ता आहे, दोन मंत्री आहेत, आमदार तुमच्या बाजूला आहेत. मी एकटा लढतोय. तुम्ही सगळा पेट्या-खोक्यावाला गोतावळा एकत्र झाला, सगळे बोके जरी एकत्र आले, तरी मी एकटा तुमच्याविरोधात उभा आहे. निवडून येऊन दाखवेन तुम्हाला मी”, असंही खडसे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *