Headlines

एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला? शरद पवारांनी दिलं मन जिंकणारं उत्तर, म्हणाले… | ncp chief sharad pawar and supriya sule interview single doctor family pune rmm 97

[ad_1]

आज पुण्यात पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ‘सिंगल डॉक्टर फॅमिली’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. ज्या कुटुंबांनी स्त्री जन्माचा आदर केला. ज्यांनी वंशाचा दिवा म्हणून मुलाची अपेक्षा न करता केवळ मुलीवर कुटुंब नियोजन केलं, अशा कुटुंबांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहिल्या. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत.

केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला असं विचारलं असता शरद पवारांनी मन जिंकणारं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्निची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं, असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे.

हेही वाचा- “…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले…

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात इतरही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार ‘खूप स्ट्रॉंग’ आहेत, असं सांगितलं आहे. शिवाय माझ्या आईकडे खूप सयंम आहे. त्यांच्या सयंमामुळेच बहुदा त्यांचा संसार इतका काळ टिकला आहे. मी आईकडून संयम घेतला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळे यांनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *