एक-दोन नव्हे 8 भाषांमध्ये Free पाहाता येणार IPL 2022 चं Live Streaming


मुंबई : आयपीएल सुरु होणार म्हटलं की क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला पारावार उतर नाही. चेन्नई मुंबई कोलकाता अशी वेगवेगळ्या संघाचे चाहते समर्थकांमध्ये एक वेगळाच जोश असतो. आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. 

आयपीएलचे सामने यावेळी 8 भाषा आणि 24 नेटवर्कवर दाखवण्यात येणार आहेत. यंदाचं आयपीएल सर्वात मोठं असेल. 10 संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. आयपीएलची कॉमेंट्री हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषेत होणरा आहे. 

स्टार आणि 80 कॉमेंटेटर्सची टीम आयपीएलसाठी तयार आहे. 26 मार्चपासून सामने सुरू होणार आहेत. हिंदी कॉमेंट्री रवि शास्त्री करणार आहेत. तर सुरेश रैना त्यांच्यासोबत असणार आहेत.

हिंदीमध्ये  आकाश चोपडा, इरफान पठान, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखिल चोपडा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेन सुंदरम यांच्याकडे असणार आहे. मराठीमध्ये कुणाल दाते, प्रसन्ना संत, चैतन्य संत, स्नेहल प्रधान, संदीप पाटील यांच्याकडे कॉमेंट्रीची जबाबदारी असणार आहे. 

स्टार स्पोर्ट्स हॉटस्टारवर आयपीएलचं लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार आहे. तुम्हाला आयपीएलचे सगळे सामने तिथे पाहता येणार आहेत. शिवाय टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. तुमच्याकडे जर डिझनी आणि हॉटस्टार असेल तर तुम्ही सामने पाहू शकता. याशिवाय तुमच्याकडे VIP Disney + Hotstar असा प्लॅन असेल तर त्यावर तुम्हाला आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत. 

तुम्ही जर एअरटेलचा 401 चा रिचार्ज केला असेल तर तुम्हाला एअरटेल अॅपवरून डिझनी आणि हॉटस्टारवर जाता येणार आहे. याशिवाय एअरटेलच्या वेगवेगळ्या प्लॅनमधून डिझनी आणि हॉटस्टार तुम्हाला मिळणार आहे. तिथून तुम्ही Disney + Hotstar महिन्याभरासाठी घेऊ शकता. 401 च्या प्लॅनमध्ये 3 GB डेटा 28 दिवसांसाठी रोज मिळणार आहे. याशिवाय फ्री हॉटस्टार वापरता येईल. 

Jio अॅपवरून जर तुम्ही रिचार्ज केला तरी तुम्हाला काही प्लॅनमध्ये डिझनी आणि हॉटस्टार फ्री मिळणार आहे. या प्लॅनच्या मदतीनं तुम्ही आयपीएल पाहण्याचा आनंद द्विगुणीत करू शकता. Jio चे 401, 777, 2599, 598,  349 असे काही प्लॅन आहेत ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. Source link

Leave a Reply