E-Shram Card Payment Status: सरकारी पैसे खात्यात यायला सुरुवात, असं चेक करा


नवी दिल्लीः Check E-Shram Card Payment Status: सरकारने श्रमिकाच्या मदतीसाठी ई-श्रम कार्डची सुरुवात केली होती. या कार्ड धारकांना सरकारकडून दर महिन्याला ५०० रुपयांची मदत केली जाते. देशातील जवळपास २८ कोटी लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सोबत या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात श्रमिकाचा विमा सुद्धा केला जातो. जर कोणत्याही स्थितीत श्रमिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयाची विमा रक्कम दिली जाते.

ई-श्रम कार्डसाठी अप्लाय करण्या आधी काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. जी व्यक्ती इनकम टॅक्स पेयर आहे, ती व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. सोबत EPFO चे खातेधारक सुद्धा या कार्डसाठी अप्लाय करू शकत नाही. सरकारकडून या योजनेचा लाभ फक्त त्याच खातेधारकांना दिला जात आहे, जे श्रमिक कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी पात्र आहेत.

वाचाः धमाकेदार ऑफर ! ९ हजारात खरेदी करा १५ हजार रुपये किमतीचा ‘हा’ स्मार्टफोन, फोनमध्ये चार कॅमेरे

ई-श्रम कार्ड असल्याचे सर्वात मोठा फायदा म्हणजे यात दुर्घटना झाल्यास किंवा अपंग झाल्यास श्रमिकाला १ लाख रुपयाची मदत केली जाते. जर तुम्हाला श्रमिक कार्ड बनवायचे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर असणे गरजेचे आहे. तुम्ही eshram.gov.in या वेबसाइटवर जावून या ठिकाणी सहज सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात.

कसे चेक करू शकता
जर तुम्हाला ई-श्रम पोर्टकडून पैसे आले की नाही हे चेक करायचे असेल तर सहज तुम्ही चेक करू शकता. तुम्ही ऑनलाइन बँकिंग वेबसाइटवर जावून चेक करू शकता. सोबत पासबुकमध्ये एन्ट्री करून हे कन्फर्म करू शकता. याशिवाय, पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावून यासंबंधी माहिती मिळवू शकता. बँकेत जावून पासबुकची एन्ट्री सुद्धा करू शकता.

वाचाः JioBook लॅपटॉपची किंमत आली समोर, संभावित फीचर्स पाहा

वाचाः 5G Launch: काय आहे Jio Glass आणि कसे करतो काम?, जाणून घ्या

Source link

Leave a Reply