Headlines

Dussehra 2022: दसरा शुभ मुहूर्त आणि पाटी पूजन, शस्त्र पूजन कसे करावे? पाहा Video

[ad_1]

Dussehra 2022: तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात नवरात्रीचा (Navratri 2022) सण साजरा करण्यात आला. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2022) , अखंड दिप पूजन करण्यात आलं. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येणारा सण म्हणजे दसरा. अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Why is Dussehra celebrated) अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी (Vijayadashami 2022) देखील म्हटलं जातं.  या दिवशी रावण दहन, शस्त्र पूजा आणि पाटीपूजन करण्याची परंपरा आहे. याशिवाय या दिवशी दुर्गा देवी, प्रभू श्रीराम, श्री गणेश यांची देखील पूजा करण्याचीही परंपरा आहे.

यंदा कधी आहे दसरा ? (Dussehra 2022 Date)

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी दसरा हा एक महत्त्वाच सण (Significance of Dussehra) आहे.  यंदा दसरा किंवा विजयादशमी 05 ऑक्टोबर 2022 रोजी ( Dussehra 2022 Importance) आहे. दशमी तिथी 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:20 वाजता सुरू होईल आणि 05 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार दसरा 05 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. (Dussehra 2022 Date and When is Vijayadashami in 2022 shubh muhurt Saraswati Puja Pati Pujan 2022 Video nmp)

दसरा पूजेचा शुभ मुहूर्त (Dussehra 2022 Shubh Muhurta)

यंदा पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 12 मिनटांची सुरु होत दुपारी 3 वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला पुजेसाठी 2 तास १५ मिनिटांची वेळ आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत आहे. हा एकूण वेळ ४५ मिनिटांचा आहे. 

सरस्वती पूजन कसं करायचं? (Saraswati Puja 2022)

पाटी (Pati Pujan 2022) किंवा वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढून घ्या. एका पाटावर कोणतेही कोरे वस्त्र अंथरुन त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवा. त्यासोबतच अभ्यासाची पुस्तकही ठेवा. सध्याच्या काळात लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम होत असल्याने त्याचीही पूजा केली जाते. त्यावर हळद-कुंकू अक्षता, फुलं वाहा. दिवा-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा. दसऱ्यादिवशी वाद्यांचीही पूजा केली जाते. 

शस्त्र पूजन (Dussehra Shastra Puja 2022)

सरस्वती पूजनसोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी घरातील शस्त्र म्हणजे सुरी, विळी, पक्कड इत्यादी मांडून त्यावरही हळद-कुंकू अक्षता वाहा. 

वाहन पूजन (Vahan Puja 2022)

सरस्वती आणि शस्त्रपूजा झाल्यावर घरातील सायकल, दुचाकी आणि चारचाकीची पूजा करावी. घरासमोर रांगोळी काढावी आणि जेवण्यात अनेक घरांमध्ये नैवेद्य म्हणून श्रीखंड, पुरी केली जाते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *