Headlines

दुखापत नाही तर या कारणामुळे के एल राहुल टीम इंडियातून बाहेर

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा ओपनगर स्टार बॅट्समन के एल राहुल सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो दुखापतीशी झुंज देत आहे. तो पूर्णपणे फिट झाला नाही असं सांगितलं जात आहे. मात्र आता स्वत: के एल राहुलने एक सिक्रेट सांगितलं आहे. 

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये केएल राहुलची निवड करण्यात आली नाही. आता राहुलनेच यामागचं कारण ट्वीट करून सांगितलं आहे. राहुलने सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

केएल राहुलने आयपीएल 2022 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळले नाहीत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचं कर्णधारपद त्याच्याकडे देण्यात आलं. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. 

दुखापतीमुळे तो इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला. त्याची जागा घेण्यासाठी अनेक युवा खेळाडू टीम इंडियामध्ये सज्ज झाले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यातूनही त्याला वगळण्यात आलं. के एल राहुल आता आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी खेळणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

मी माझ्या आरोग्याबाबत काहीतरी तुमच्याशी शेअर करू इच्छितो असं म्हणत राहुलने ट्वीट केलं. जूनमध्ये माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ट्रेनिंग सुरू केलं. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाकडून खेळायचं होतं. 

केएल राहुलने आपल्या पत्रात पुढे लिहिले की, ‘झिम्बाब्वे दौऱ्यावर सहभागी होण्यासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या जवळ होतो, पण त्यानंतर मला कोविड-19 चा फटका बसला. त्यामुळे मला आता लवकरात लवकर यातून पूर्ण बरं व्हायचं आहे. टीम इंडियाकडून खेळण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करू शकत नाही असंही त्याने म्हटलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *