Headlines

वाहन चालकांसाठी मोठा बातमी, केंद्र सरकारकडून नुकसान भरपाईत आठपट वाढ

[ad_1]

मुंबई : देशात दररोज अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांना कायमचं अपंगत्व येतं. तर काहींना जीवाला मुकावं लागतं. केंद्र सरकारने रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘हिट अँड रन’ प्रकरणात एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तिच्या नातेवाईकांना तब्बल आठपट अधिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून नुकसान भरपाईच्या राशीत वाढ करुन एकूण रक्कम 2 लाख रुपये करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. (central government big decision now 8 times more compensation will be given to next of kin of the victim in the hit and run case)

नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याचा निर्णय
 
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, अशा घटनांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. आता ही रक्कम 12 हजार 500 रुपयांवरून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. आता ‘हिट अँड रन’ मधील मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याच्या उद्देशाने मोटार वाहन अपघात निधीही तयार केला जाणार आहे.

‘हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, 2022’’ (Compensation to Victims of Hit and Run Motor Accidents Scheme, 2022) असं या योजनेचं नाव असेल, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार आहे.

मंत्रालयाच्या प्रसिद्ध पत्रकानुसार,  ‘हिट अँड रन’ प्रकरणातील नुकसान भरपाई देण्याबाबतची अधिसूचना ही 25 फेब्रुवारी 2022 ला जारी केली गेली होती. ज्यामध्ये नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.   

तब्बल आठपट मिळणार भरपाई

अपघातात गंभीर जखमी झालेल्यांसाठी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर मृत्यू झाल्यास 2लाख रुपये देण्यात येणार आहे. याआधी ही रक्कम 25 हजार इतकी होती. 

दिलासादायक बाब म्हणजे आता नुकसान भरपाईसाठीच्या रक्केमसाठी अर्ज करणं आणि त्या रक्कमेच्या प्रक्रियेसाठी अंतिम मुदत निश्चित केली गेली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ठराविक वेळेत रक्कम मिळेल.   



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *