Headlines

Drishyam 2 Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘दृश्यम 2’ ला बसला फटका, चित्रपट लीक

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), याचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारखेची घोषणा केल्यापासून प्रेक्षक त्यासाठी उत्सुक होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार अशा अपेक्षा सगळ्यांनाच लागल्या आहेत. या चित्रपटातून बॉलिवूड पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमबॅक करणार असा विचार सगळे करत आहेत.  मात्र, हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला आहे. 

‘दृश्यम 2’ चित्रपट झाला लीक…

या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र, दुसऱ्या चित्रपटाबाबत चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tamilrockers, Movierulz आणि Filmyzilla सारख्या साइट्सनं अजयच्या ‘दृश्यम 2’ ला ऑनलाइन लीक केलं आहे. हे कळल्यानंतर निर्माते नाराज झाले आहेत. चित्रपट लीक झाल्यानंतर त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल असे दिसून येत आहे. 

हेही वाचा : Saif Ali Khan च्या पतौडी पॅलेसची झलक; दुर्दैवानं या संपत्तीवर त्याला हक्कच नाही, का पाहाच

अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरन यांचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून 4.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

रिपोर्ट्सनुसार, अजयनं या चित्रपटासाठी 30 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्याचसोबत तब्बूनं (Tabu) या चित्रपटासाठी 3.5 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रेया सरननं (Shriya Saran) या चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नानं (Akshay Khanna) देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर त्यानं या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री ईशिता दत्तानं या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका साकारण्यासाठी ईशितानं 1.2 कोटी फी घेतली आहे. 

‘दृश्यम 2’ चित्रपटात अजयसोबत तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. ‘दृश्यम’च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. ‘दृश्यम 2’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. (Drishyam 2 Tamilrockers Telegram Filmizilla Movierulz Leaked Ajay Devgn Tabu Shriya Saran Akshay Khanna Starrer online) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *