Headlines

Dress Astrology: लकी कलर, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत; अधिक जाणून घ्या

[ad_1]

Auspicious Colors According To Days: अनेकांचा लकी नंबर असतो. तसेच लकी कलरही असतो. आवत्या रंगाचा शर्ट किंवा ड्रेस  आपल्यासाठी खास असतो. आपल्या जीवनावर  स्वत: कपड्यांचा रंग तसेच रंगांचा खूप प्रभाव पडतो. पण ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही दिवशी कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्हीही ही चूक करत असाल तर लगेचच सावध व्हा. कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा शर्ट घालणे तुमच्यासाठी लकी किंवा फायदेशीर ठरु शकते, ते तुम्ही जाणून घ्या.

रविवार

हा दिवस भगवान सूर्याचा आहे. या दिवशी तुम्ही गुलाबी, हलका लाल, पिवळा किंवा हलका भगवा रंगाचा शर्ट घालू शकता. गडद भगव्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. 

सोमवार

या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. हा दिवस चंद्राला देखील समर्पित आहे. या दिवशी तुम्ही हलका निळा किंवा पांढरा शर्ट घालू शकता. 

मंगळवार

हिंदू मान्यतेनुसार मंगळवारी हनुमानजीची पूजा केली जाते. मंगळ हा ग्रहांच्या जगात सेनापती मानला जातो. या दिवशी लाल किंवा भगव्या रंगाचा शर्ट घालणे तुमच्यासाठी शुभ राहील.

बुधवार

बुध ग्रह व्यवसाय, अभ्यास, बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि परीक्षांचा कारक मानला जातो. या दिवशी तुम्ही हिरवा शर्ट घालावा. पण लक्षात ठेवा की हिरवा शर्ट जास्त घालू नका कारण ते आयुष्य कंटाळवाणे बनवते. 

गुरुवार

हा दिवस गुरु किंवा बृहस्पतिचा आहे. कुंडलीत गुरु ग्रह बलवान असेल तर बाकी दोषांचा फारसा प्रभाव पडत नाही. गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

शुक्रवार

शुक्र आकर्षण आणि सुख किंवा लक्झरीचे प्रतिनिधीत्व दर्शवते. या दिवशी तुम्ही क्रीम, पांढरा किंवा गुलाबी रंगाचा शर्ट घालावा. 

शनिवार

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. तो न्यायदेवता आहे. ज्यावर शनिदेवाची कृपा होते. त्याच्या आयुष्यातून सर्व दु:ख दूर होतात आणि कोणावर वाईट नजर पडली तर राजाही रंक होतो. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी निळा किंवा काळा शर्ट घालावा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *