Headlines

Dream11 वर ५९ रुपये गुंतवून ११ क्रिकेटर्स निवडले, अखेर त्याने जिंकले २ कोटी

[ad_1]

मुंबई : ते म्हणतात ना, ‘ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ कर देता है’, ही म्हण आता प्रत्यक्षात उतरली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. देशातभरात सध्या आय पी एल IPL ने धुमाकूळ घातला आहे.अनेक क्रिकेटप्रेमी आय पी एल IPL चा आनंद घेत आहे. तसेच काही क्रिकेटप्रेमी करोडपती देखील होत आहेत. यात काही भाग्यवान क्रिकेटफॅन्सही आहेत. बिहारच्या सारण जिल्ह्यातील रमेश कुमार हा एक भाग्यवान आहे.

व्यवसायाने कार ड्रायव्हरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या रमेशने, आयपीएलशी संबंधित एका अॅप मध्ये आयपीएल IPL टीम निवडून  2 कोटी रुपये जिंकले आहेत. अमनौर पोलीस स्टेशन हद्दीतील काज रसूलपूर येथील रहिवासी जगदीश महतो यांचा मुलगा रमेश कुमार याने ड्रीम-11 वर अशा प्रकारची आयपीएल टीम बनवली, जी देशात प्रथम क्रमांकावर होती.

त्याच्या टीमने 2 कोटींची बक्षिसे जिंकली आहेत. आयपीएलशी संबंधित एका अॅपवर टीम बनवून करोडपती झालेल्या रमेशच्या घरात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. या अनपेक्षित मिळालेल्या बक्षिसावर त्याच्यासोबत कोणाचाही विश्वास बसत नाही.  

रमेशने सांगितले की, तो अनेक वर्षांपासून अॅपवर टीम बनवत होता. गेल्या मंगळवारी पंजाब किंग्ज Punjab Kings आणि लखनऊ सुपर जायंट्स Lucknow Super Giants यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी त्याने आयपीएल Ipl संघ तयार केला. त्यात त्याने कागिसो रबाडाला Kagiso Rabada कर्णधार तर शिखर धवनला Shikhar Dhawan उपकर्णधार बनवले होते.

या सामन्यात रबाडाने 3 बळी घेतले, सोबतचं शिखर धवननेही सर्वोत्तम खेळी खेळली. सामना संपल्यानंतर रमेशने तयार केलेल्या संघाला सर्वाधिक गुण मिळाले आणि त्याचा आयपीएल संघ देशात पहिल्या क्रमांकावर होता. यानंतर लगेचं रमेशला २ कोटी रुपये जिंकण्याचा मेसेज आला.

अनपेक्षित आलेल्या या मेसेजमुळे यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जीएसटी कापल्यानंतर त्यांच्या खात्यात एकंदरीत १ कोटी ४० लाख रुपये जमा करण्यात आले.

59 रुपये गुंतवून करोडपती

रमेश सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. अनेक लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. रमेशने सांगितले की देवाने त्याच्यासाठी कुबेरचे दुकान कसे उघडले यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने मोबाईल अॅपवर 59 रुपये गुंतवून टीम तयार केली आणि 2 कोटी रुपये जिंकले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *