डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या  मिरवणुकीत केले पाणी वाटप  ,मुस्लिम बांधवांचा अनोखा उपक्रम

बार्शी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात मध्यवर्ती भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी आलेल्या अनुयायांना मुस्लिम बांधवांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक उपस्थित होते.उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना पाण्याची गरज भासत होती.या नागरिकांची तहान भागवून सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवून दिले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या  मिरवणुकीत पाणी वाटप केले. सध्या मुस्लीम धर्मीयांचा पवित्र  रमजान महिना सुरू आहे.स्वतःचा उपवास असताना भीम अनुयायांसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.या उपक्रमाचे समाजाच्या प्रत्येक स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमास यशस्वीपणे पार करण्यासाठी मोहसीन तांबोळी,वसीम पठाण,शोएब सय्यद,युन्नूस शेख,यासिन काझी,सलीम चाचा चौधरी,सलीम शेख,मुजाहिद जिकरे,सरफराज शेख,शोएब शेख,रमिज तांबोळी,शाबाज शेख,इम्तियाज शेख,हाफिज तांबोळी,जाकीर शेख,रिझवान तांबोळी,रोनी सय्यद,अमन शेख,सज्जाद शेख,समीर झरेकरी,शकील झरेकरी,सलमान सातारकर,रजा शेख,आलीम तांबोळी आदी मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply