‘डोक्यावर परिणाम झालायं का?’ फरहान अख्तरच्या बायकोचा तो व्हिडीओ पाहून नेटीझन्सना पडलाय प्रश्न


मुंबई :  सगळेच सेलिब्रिटी आज काल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तसेच यामुळे ते आपल्या चाहत्यांना आपल्या विषयी माहिती देत असतात, ज्यामुळे त्यांचे फॅन्स देखील त्यांना फॉलो करु लागतात. शिबानी दांडेकर देखील सोशल मीडियावर तशी ऍक्टिव्ह होती. परंतु आता फरहान अख्तरसोबत लग्न केल्यानंतर शिबानी दांडेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. आता एका अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर शिबानी काय करते? कुठे जाते? किंवा फरहान आणि शिबानी लग्नानंतर कसं आयुष्य जगतात? हे त्यांच्या चाहत्यांना पाहाण्यासाठी आवडते. ज्यामुळे सध्या शिबानी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

सध्या शिबानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यामध्ये विचित्र वागताना दिसत आहे अशी चर्चा होऊ लागली आहे. ज्यामुळे लोकं असं ही म्हणू लागले आहेत की, लग्नानंतर तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? 

परंतु तसे नाही. शिबानी खरंतर एक ट्रेंड फॉलो करत आहे. ज्यामध्ये ती उगाचच काहीही न करता सिरिअस एक्प्रेशन देऊन पायांवरती खाली बसत आहे. अशी ती बऱ्याचदा करते. ज्यामध्ये ती तिच्या मेकअप अर्टिस्ट सोबत तर कधी बाथरुममध्ये शॉवर घेऊन नाचताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शिबानीने स्वत: आपल्या इंस्टाग्रामवरती शेअर केला आहे. ज्याला पोस्ट करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “मला काहीच कल्पना नाही आम्ही इथे काय करतोय? मला फक्त एवढंच माहित आहे की, हा वेळ खूप चांगला गेला. माझ्या लोकांसाठी खूप सारं प्रेम.”

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर कधी एकत्र तर कधी स्वत: एकट्याचे व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असतात.

फरहान अख्तर आणि शिबानी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. खंडाळा येथील शबाना आझमी यांच्या फार्म हाऊसवर दोघांचे लग्न झाले. विशेष म्हणजे या दोघांनीही हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केलं नाही. फरहान आणि शिबानी यांनी अंगठी घालून एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेऊन आपलं लग्न पार पाडलं.Source link

Leave a Reply