Headlines

ऑनलाइन शॉपिंग करताना होईल हजारो रुपयांची बचत, फॉलो करा ‘या’ टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सहज अनेक गोष्टी करणे शक्य आहे. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टी खरेदी करू शकता. ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक सेल आणि ऑफर्स आणत असतात. नियमित बाजाराच्या तुलनेत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आकर्षक डिस्काउंट मिळत असते. त्यामुळे ग्राहक देखील ऑनलाइनच शॉपिंग करण्याला प्राधान्य देतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर्स, बँक ऑफर्स, कूपन कोडचा फायदा मिळतो. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करताना तुमची मोठी बचत होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सेल्सची बघा वाट

तुम्ही जर एखादी महागडी वस्तू ऑनलान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स वेबसाइटवर आयोजित केल्या जाणाऱ्या सेल्सची वाट पाहा. सेल्समध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळतो. त्यामुळे सेल्स दरम्यान शॉपिंग करताना तुमची शेकडो रुपयांची बचत होईल. ई-कॉमर्स वेबसाइटवर दर आठवड्याला नवनवीन सेलचे आयोजन केले जाते.

क्रेडिट कार्डवर मिळेल आकर्षक सूट

ऑनलाइन शॉपिंग दरम्यान डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास आकर्षक डिस्काउंटचा फायदा मिळेल. क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्यास तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

प्रोडक्ट्सची करा तुलना

तुम्ही जर एखाद्या प्रोडक्टला ऑनलाइन खरेदी करत असाल तर अशा स्थितीमध्ये त्या प्रोडक्टला इतर प्रोडक्टशी कंपेअर करायला हवे. तुम्ही त्या प्रोडक्ट्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत चांगले वाटत असल्यास तुम्ही ते खरेदी करू शकता. अशाप्रकारे तुमची मोठी बचत होईल.

वीक डेजवर शॉपिंग करणे टाळा

अनेकजण आठवड्याच्या शेवटी, सुट्टी असताना शॉपिंग करतात. तुम्ही देखील वीक डेजवर शॉपिंग करत असाल, तर असे करणे टाळा. वीक डेजवर अनेक प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ होते. त्यामुळे वर्किंग डेजवर शॉपिंग करायला हवी. वर्किंड डेजवर शॉपिंग केल्यास तुम्हाला वस्तूवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

वाचाः अशी संधी पुन्हा नाही! २५ हजारांचा फोन फक्त ५ हजारात होईल तुमचा, मिळतो १०८ मेगापिक्सल कॅमेरा; पाहा डिटेल्स

वाचाः २० एप्रिलला भारतात लाँच होणार Redmi चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

वाचाः घरीच घ्या थिएटरचा आनंद! फक्त ९,९९९ रुपयात मिळतोय ५० इंच स्मार्ट टीव्ही, EMI वरही खरेदीची संधी

वाचाः स्वस्त स्मार्टवॉच खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Dizo Watch S; पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *