Headlines

चूकनही तुळशीभोवती ‘या’ 5 गोष्टी ठेवू नका, नाहीतर होईल तुमचे नुकसान

[ad_1]

मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीमध्ये लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. ज्यामुळेच आपल्याला घराघरात तुळस लावलेली दिसते. एवढंच नाही तर तुळशीला आयुर्वेदात देखील महत्व आहे. शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहते तेथे सुख, शांती आणि समृद्धीही नांदते. ज्यामुळे बऱ्याच हिंदू घरात आपल्याला तुळशीचं रोपटं दिसतं. परंतु कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागते. ज्यामध्ये तुळशीच्या बाजूला काहीही न ठेवण्याचा इशारा दिला जातो. तर आता तुळशीभोवती कोणत्या वस्तु ठेवू नये. हे जाणून घ्या.

ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जर तुळस सुकत असेल किंवा कोमेजत असेल तर ती अशुद्धतेमुळे असू शकते. अशा परिस्थितीत दररोज तुळशीभोवती स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

तुळशीच्या आजूबाजूला केर, पादुका, झाडू किंवा कचरा नसावा. याशिवाय तुळशीच्या रोपासोबत इतर फुले किंवा झाड लावू नयेत. ज्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते तेथे दुसरे रोप लावणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे तुम्ही देखील ही चूक करत असाल, तर ती पुन्हा करु नका.

तुळशीला चांगले ठेवायचे असेल, तर असे म्हटले जाते की, दुधात पाणी मिसळून तुळशीला वाहिल्याने तुळस हिरवी राहते.

अनेकवेळा लोक संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना जल अर्पण करतात. परंतु हे लक्षात घ्या की, संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करणे शुभ मानले जात नाही. याशिवाय तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये.

तसेच तुळशीचा दिवा विझल्यानंतर त्याला तेथून काढून टाका, कारण तुळशीजवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते.

घरांमध्ये तुळशीला ओढणीने झाकून ठेवले जाते. अशा वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ओढणी जुनी झाल्यावर किंवा फाटल्यावर, तिला एकादशी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर बदलून टाकावे.

अनेकदा महिला आंघोळीनंतर खुल्या केसांमध्ये तुळशीला पाणी देतात. तुळशीला सदैव आनंदी राहण्यासाठी देवाकडून वरदान मिळाले आहे. अशा वेळी केसांना बांधून आणि लग्न झालेल्या महिलांनी सिंदूर लावून तुळशीला पाणी अर्पण करावे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *