पॉवरबँक खरेदी करताना घाई करू नका, सर्वात आधी या गोष्टी चेक करा


नवी दिल्लीः Power Bank Tips : जर तुम्ही सतत प्रवास करीत असाल अशावेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. त्यावेळी तुम्हाला पॉवर बँकची गरज भासते. जर तुम्हाला पॉवर बँक खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो खरेदी करताना कोणतीही घाई करू नका. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी पॉवरबँक खरेदी करण्यासाठीच्या खास टिप्स सांगत आहोत, जाणून घ्या डिटेल्स.

पॉवर बँकची कॅपिसिटी
पॉवर बँक खरेदी करताना सर्वात आधी त्या पॉवरबँकची कॅपिसिटी चेक करा. कॅपिसिटी म्हणजे पॉवर बँकचे mAh आहे. तसेच पॉवर बँक मधून निघणारे आउटपूट व्होल्टेज तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हेही चेक करा. जर आउटपूट व्होल्टेज फोनच्या चार्जिंगपेक्षा कमी असेल तर फोन चार्ज होणार नाही. जर तुमच्या फोनची 1,500mAh आहे तर तुम्हाला 3,000mAh किंवा त्यापेक्षा जास्त पॉवरचे पॉवरबँक खरेदी करावे लागेल.

क्वॉलिटी आणि सेफ्टी

पॉवर बँक खरेदी करताना त्याची क्वॉलिटीची तपासणी करा. किती लवकर फोन चार्ज केले जाते. चार्जिंग किती वेळेपर्यंत टिकते, हे पाहा. कारण, खराब क्वॉलिटीचे पॉवर बँक तुमचा फोन खराब करू शकतात.

USB चार्जिंग ऑप्शन

पॉवर बँकेचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यात चार्जिंगसाठी अनेक सारे पोर्ट दिले आहेत. म्हणजेच फोनला चार्ज करू शकतील. पॉवर बँक मध्ये अनेक टाइपचे कनेक्टर पोर्ट असायला हवे. यामुळे मोबाइल फोन आणि टॅबलेट सुद्दा चार्ज करता येवू शकते.

LED इंडिकेटर

पॉवर बँकेत LED इंडिकेटर असणे खूप गरजेचे आहे. यावरून बॅटरी लेवल कळते. तसेच पॉवर बँक किती चार्ज झाला हेही कळते. त्यामुळे एलईडी इंडिकेटरचे पॉवर बँक खरेदी करण्याला प्राधान्य द्यायला हवे.

ब्रँड

पॉवर बँक ज्यावेळी खरेदी कराल त्यावेळी तो ब्रँड कंपनीचा खरेदी करण्याला प्राधान्य द्या. याचा फायदा म्हणजे तुम्हाला पॉवर बँकेत बॅटरी आणि चार्जिंग सर्किट जबरदस्त मिळू शकतात. कारण, फोनची किंमत पॉवर बँकच्या तुलनेत खूप जास्त असते.

वाचाः खूपच कमी किमतीत iPhone होईल तुमचा, ऑफरचा आज शेवटचा दिवस,पाहा डिटेल्स

सेफ्टी

जगातील कोणतेही काम असले तरी त्याची सुरक्षा ठेवावी लागते. अनेक यूजर्स रात्री झोपताना मोबाइलला पॉवर बँक सोबत चार्ज करून ठेवतात. त्यामुळे खराब बॅटरीच्या पॉवर बँकेत ब्लास्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे लिथियम पॉलिमर बॅटरीचे पॉवर बँक खरेदी करा. कारण, या सेफ्टीत लिथियम बॅटरी चांगल्या असतात.

पॉवर बँकेचा अॅम्पियर
नेहमी हे ध्यानात ठेवा की, पॉवर बँक खरेदी करताना त्याचे अॅम्पियरचे पॉवर सप्लाय करते का. जर तुमच्या फोनला 2.1 amps पॉवरची गरज असेल तर तुम्हाला 2.1 amps किंवा त्यापेक्षा जास्त पॉवरचे पॉवर बँक खरेदी करावे लागेल.

वाचाः अवघ्या १९ रुपयात महिनाभर सुरू राहील तुमचा मोबाइल नंबर, या टेलिकॉम कंपनीने लाँच केला प्लान

Source link

Leave a Reply