Diwali 2022: दिवाळीत ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, देवी लक्ष्मीची असेल विशेष कृपा!


Diwali Grah Gochar: ऑक्टोबर महिना सुरु होताच सर्वांना दिवाळी या सणाचे वेध लागले आहेत. या सणावेळी ग्रहांची आपल्याला साथ मिळणार का? याबाबत ज्योतिषांनी काही भाकितं केली आहेत. 24 ऑक्टोबरपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पण 23 ऑक्टोबर रोजी शनि मकर राशीत मार्गस्थ होणार आहे. दुसरीकडे, 26 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. तर सूर्य, शुक्र आणि केतू हे ग्रह त्यावेळी तूळ राशीत असणार आहे. अशा स्थितीत तूळ राशीमध्ये 4 महत्त्वाच्या ग्रहांची उपस्थितीमुळे एक अद्भुत योगायोग असणार आहे. हा योग काही राशींसाठी खूप शुभ असेल. अशा प्रकारे दिवाळीनंतर बुधाचा गोचरामुळे देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.

मिथुन – दिवाळीच्या 2 दिवसांनंतर बुधाचे तूळ राशीत होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. उत्पन्न वाढेल. नोकरी-व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. प्रदीर्घ समस्या सुटतील.

कर्क – दिवाळीनंतर कर्क राशीच्या लोकांना पैसा मिळेल. देवी लक्ष्मीची या राशीवर कृपा असले. या काळात बुद्धीची साथ मिळेल आणि अडकलेली कामं मार्गी लागतील. नशीबही तुम्हाला खूप साथ देईल. आदर वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

सिंह – बुध गोचर सिंह राशीच्या लोकांना धनलाभ देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबाकडून आनंद आणि सहकार्य मिळेल.

वृश्चिक – बुध गोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. पगार वाढू शकतो. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. विशेषतः परदेशात नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल.

Shani Budh Margi: शनि बुध ग्रह मार्गस्थ होताच ‘या’ चार राशींना मिळणार साथ

धनु – आर्थिक अडचणी दूर होतील. पुरेसा पैसा हातात येईल. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. उत्पन्नही वाढेल. कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल.

मकर – बुध ग्रहाचा गोचर मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे लाभ देईल. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply