Headlines

Divya Bharti Death : दिव्या भारती हिच्या मृत्यूच्या रात्री काय घडलं? संपूर्ण कथा उघडकीस आली, पण…

[ad_1]

मुंबई : Divya Bharti Death Anniversary :  दिव्या भारती  (Divya Bharti) हिच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक लोक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिची आठवण काढताना दिसत आहेत.

एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दिव्या भारती  (Divya Bharti)  हिने अगदी लहान वयातच स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ती तिच्या सौंदर्याने, निरागसतेने आणि प्रतिभेने लाखो हृदयांवर राज्य करत होती. 25 फेब्रुवारी 1974 रोजी तिचा जन्म झाला आणि 5 एप्रिल 1993 रोजी तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला. 

दिव्या भारतीच्या निधनाने इंडस्ट्रीला तसेच संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. आजही तिच्या मृत्यूबद्दल सांगितले जाते की, ही आत्महत्या होती की हत्या, हे सांगणे कठीण आहे. हे गूढ आजतागायत उकललेले नाही.

मृत्यू कसा झाला ?

मृत्यूसमयी दिव्या भारतीचे वय 19 वर्ष होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्या भारती हिचा मृत्यू झाला. त्या रात्री दिव्या तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पार्टीतून ब्रेक घेऊन ती दिवाणखान्याच्या खिडकीजवळ येऊन बसली आणि तिथून खाली पडली. दिव्या पाचव्या मजल्यावरून तळमजल्यावरुन पडली होती. यानंतर तेथे उपस्थित लोकांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी दिव्याच्या मृत्यूला अपघात म्हटले होते. मात्र, आजही दिव्या खिडकीतून कशी पडली, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही.

 स्वप्नात पाहिले

त्यादरम्यान काही रिपोर्ट्समध्ये दिव्याची हत्या झाल्याचा दावाही करण्यात आला होता आणि काहींनी आत्महत्येचा उल्लेखही केला होता. दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आईची एक भावनिक मुलाखतही चर्चेत होती. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने तिच्या मुलीला तिच्या स्वप्नात अनेकदा पाहिले आहे. दिव्याच्या आईने सांगितले होते की, जेव्हाही तिला लवकर उठायचे असते तेव्हा दिव्या स्वप्नात यायची आणि प्रेमाने उठवून निघून जायची. त्याचबरोबर दिव्याने भलेही हे जग सोडले असेल पण ती तिच्या चित्रपटातून लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहील.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *