Breaking News

भिवंडीत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

भिवंडी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून २१० बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्याचा कार्यक्रम भिवंडीतील दुगाडफाटा येथे पार पडला.
भिवंडीत गेली अनेक वर्षे कामगारांचे प्रश्न घेऊन कॉ. रमेश जाधव, कॉ. स्वप्निल भोईर आणि त्यांचे सहकारी लढत असतात.

सुरक्षा साधना अभावी कामगारांच्या अपघातांचे तसेच मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच समोर येत असतो. म्हणून मंडळाच्या या योजनेचा लाभ तळागाळातील कामगारांना मिळावा यासाठी शेकडो कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून, वेळोवेळी मंडळाकडे कामगारांच्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून भिवंडीतील कामगारांना सुरक्षा किटचा लाभ त्यांनी मिळवून दिला.


तसेच कामगारांना मिळणाऱ्या इतरही योजनेचा लाभ आम्ही त्यांना मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहू असे कॉ. रमेश जाधव यांनी म्हटले.


सदर कार्यक्रम कॉ. रमेश जाधव, कॉ. स्वप्निल भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी APMC मार्केट दुगाडफाटा, भिवंडी येथे आयोजित केला होता. तसेच कार्यक्रमास भिवंडीतल्या विविध गावातील महिला पुरुष कामगार उपस्थित होते.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!