कन्नड चित्रपट ‘Kantara’ बाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केल मोठं विधान


मुंबई : कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची (Kantara) सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट सध्या सर्वच सिनेमांना मागे टाकत सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट बनत चालला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक हा चित्रपट पाहून आपआपली मत व्यक्त करत आहेत. त्यात आता बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटावर मोठं विधान केले आहे.   

विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) ऋषभ शेट्टीचा कंतारा हा चित्रपट पाहिला आहे. चित्रपटाचे कौतुक करताना ते म्हणाले आहेत की,’आत्ताच चित्रपट पाहिला, चित्रपट पाहिल्यानंतर, एक लफज तोंडातून आला तो म्हणजे वाह! यासोबतच विवेक पुढे म्हणाले की, एवढा अप्रतिम चित्रपट यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता.

या प्रतिक्रियेनंतर विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri) आपल्या चाहत्यांना चित्रपट पाहण्याचा सल्लाही दिला आहे. यासोबतच त्यांनी या उत्कृष्ट चित्रपटासाठी दिग्दर्शक ऋषभ शेट्टीसह (Rishabh Shetty) कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या आधी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने देखील ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कंतारा (Kantara) या चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटाचे कौतुक करताना कंगना म्हणाली की, हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा.

‘कंतारा’ (Kantara)’ चित्रपटाचे ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शक असून विजय किरागांडूर (Vijay Kiragandur) निर्माते आहेत. यासह या चित्रपटात ऋषभ शेट्टी, किशोर (Kishore), प्रमोद शेट्टी (Pramod Shetty) आणि सप्तमी गौडा (Sapthami Gowda) यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची खुप चर्चा आहे.



Source link

Leave a Reply