दिपीका पदुकोणचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘माझ्या मनात आत्महत्येचे विचार’….


मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हे सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलणारी ती अभिनेत्री आहे. ती ही एकेकाळी डिप्रेशनचा भाग असल्याचं बोलली आहे. त्याचबरोबर आता दीपिका पदुकोणने तिच्या नैराश्यावर मौन सोडलं असून एक धक्कादायक खुलासा केला आहे. जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘ती डिप्रेशनमध्ये आहे. हे तिच्या आईने ओळखलं.  डिप्रेशचा अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझ्या आईला पूर्ण श्रेय देईन की, तिने हा आजार ओळखला, कारण मी चांगलं काम करत होते, माझ्या करिअरच्याही उंचीवर होते. पण अचानक माझं वागणं बदललं होतं. त्या दिवसात मला फक्त  झोप हवी होती. कारण झोप ही अशी एकमेव गोष्ट होती. ज्यामुळे मला थोडं बरं वाटायचं. माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे आणि मला त्यांच्याशी लढायचं होतं.  

यासोबत ती म्हणाली, ‘माझे आई-वडील बंगळुरूमध्ये राहतात आणि जेव्हा ते मला भेटायला यायचे, तेव्हा मी नेहमी स्वत:ला खंबीर दाखवायचे कारण तुम्हाला त्यांना दाखवायचें आहे की तुम्ही चांगले आहात, सर्व काही ठीक आहे. एके दिवशी माझे आई-वडील बंगलोरला परत जात असताना अचानक मी रडायला लागले, त्यानंतर माझ्या आईने मला विचारलं, बॉयफ्रेंडमध्ये आणि तुझ्यात काही झालं आहे का? कामात काही घडलं आहे का? कोणी काही बोललं आहे का?

माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती कारण असं काहीही झालं नव्हतं, माझ्या आत फक्त एक शून्यता होती. हीच ती वेळ होती जेव्हा माझ्या आईला समजलं की, मी डिप्रेशनमध्ये आहे. म्हणून हे ओळखण्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते. आता ती या परिस्थितीतून बाहेर आली आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे. यासोबतच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट-के’मध्येही दिसणार आहे.Source link

Leave a Reply